मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Leftover Rice Recipe: उरलेला भात टाकू नका त्यापासून बनवा टेस्टी पराठा, नोट करा रेसिपी

Leftover Rice Recipe: उरलेला भात टाकू नका त्यापासून बनवा टेस्टी पराठा, नोट करा रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 20, 2024 07:50 PM IST

Rice Paratha: तुम्ही सुद्धा उरलेला भात फोडणी देऊन खात असाल तर यावेळी त्यापासून पराठा बनवा. ही रेसिपी खूप सोपी आणि टेस्टी आहे.

उरलेल्या भाताचा पराठा
उरलेल्या भाताचा पराठा (freepik)

Paratha With Leftover Rice Recipe: अनेक वेळा दुपारी बनवलेला भात उरतो. काही लोक याला फोडणी देऊन खातात. तर काही लोक उरलेला भात इतर टेस्टी पद्धतीने वापरतात. तर काही लोक हा भात टाकून देतात. जर तुमच्या घरी सुद्धा दुपारी जेवणातील भात उरला असेल तर तो फेकू नका. तर त्यापासून रात्रीसाठी कंप्लीट मील तयार करा. तुम्ही या उरलेल्या भातापासून पराठा बनवू शकता. हे केवळ चवदारच नाही तर बनवायलाही सोपे आहे. चला तर मग जाणून घ्या उरलेल्या भातापासून पराठे कसे बनवायचे.

उरलेल्या भातापासून पराठे बनवण्यासाठी साहित्य

- गव्हाचे पीठ

- १ वाटी शिजवलेला भात

- १ बारीक चिरलेला कांदा

- १ चमचा आले-लसूण पेस्ट

- १ हिरवी मिरची बारीक चिरलेली

- पुदिन्याची पाने बारीक चिरलेले

- कोथिंबीर

- २ चमचे लाल तिखट

- हळद

- १ चमचा तेल

- १ चमचा जिरे

- १ चमचा देशी तूप

- मीठ चवीनुसार

उरलेल्या भातापासून पराठा बनवण्याची पद्धत

हा टेस्टी पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम गव्हाच्या पिठात थोडे मीठ आणि तेल घालून चांगले मळून घ्या. पीठ खूप मऊ मळून घ्या. आता कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका. जिरे तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परता. कांद्याचा रंग बदलू लागल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट घालून मिक्स करा. हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, मीठ घालून मिक्स करा. आता शिजवलेला भात घाला आणि मंद आचेवर भाजून घ्या. आता त्यात कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने टाकून मिक्स करा. हा भात थोडा मॅश करा. आता गव्हाच्या पिठाचा गोळा तयार करून त्यात भाताचे तयार केलेले मिश्रण भरून लाटून घ्या. 

तव्यावर दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा. तुमचा टेस्टी भाताचा पराठा तयार आहे. गरमा गरम पराठा चटणी, लोणचं किंवा दहीसोबत सर्व्ह करा.

WhatsApp channel