मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fresh Skin: त्वचेला फ्रेशनेस देईल पुदिना, सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी असा करा वापर

Fresh Skin: त्वचेला फ्रेशनेस देईल पुदिना, सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी असा करा वापर

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 28, 2024 10:53 AM IST

Skin Care With Pudina: जर चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसत असेल आणि चमक नाहीशी झाली असेल तर नुसते स्क्रब करून फायदा होणार नाही. पुदिना आणि एलोवेराचा फेस पॅक लावल्याने त्वचेवरील डलनेस दूर होईल.

फ्रेश त्वचा मिळवण्यासाठी पुदिन्याचा फेस पॅक
फ्रेश त्वचा मिळवण्यासाठी पुदिन्याचा फेस पॅक (Freepik)

Pudina Face Pack for Dull Skin: प्रत्येकाला चेहऱ्याची त्वचा सुंदर बनवायची असते. त्यासाठी बहुतांश लोक बाजारातील केमिकल प्रोडक्टवर अवलंबून असतात. पण आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक वस्तू आहेत, ज्यांच्या मदतीने आपण स्वच्छ, चमकदार त्वचा मिळवू शकतो. आपण दररोज घराबाहेर पडतो आणि आपल्या चेहऱ्यावर धुळीचे कण जमा होतात. अनेक वेळा त्वचा स्वच्छ केल्यानंतरही निस्तेजपणा दिसून येतो. अशा परिस्थितीत त्वचेला थोडा फ्रेशनेस देण्याची गरज असते. जेणेकरून चेहऱ्यावरील निस्तेजपणा निघून जाईल. या कामात पुदिना तुमची मदत करेल. पुदिन्यापासून घरच्या घरी फेस पॅक बनवता येतो, जो त्वचेचा डलनेस दूर करून त्वचा फ्रेश बनवतो. हा फेस पॅक कसा बनवायचा आणि वापरायचा ते जाणून घ्या.

पुदिन्याच्या पानांचा फेस पॅक बनवा

पुदिन्याच्या पानांच्या मदतीने फेस पॅक बनवा आणि चेहऱ्यावर लावा. त्यामुळे चेहऱ्यावरचा थकवा आणि निस्तेजपणा दूर होऊन त्वचा चमकू लागते. हे करण्यासाठी तुम्हाला फक्त ३ गोष्टी आवश्यक आहेत.

- ४-५ पुदिन्याची पाने

- एक चमचा एलोवेरा जेल

- ४-५ थेंब ग्लिसरीन

असा बनवा आणि वापरा फेस पॅक

फेस पॅक बनवण्यासाठी आधी पुदिन्याची पाने नीट धुवून बारीक करा. जेणेकरून त्याची पेस्ट तयार होईल. आता या पेस्टमध्ये एलोवेरा जेल आणि ग्लिसरीनचे काही थेंब घाला. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी फेसवॉशने चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. नंतर हा पुदिन्याचा फेस पॅक लावून अर्धा तास तसाच राहू द्या. अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेला ग्लो येण्यास मदत होईल.

पुदिन्याने कशी मिळते ग्लोइंग स्किन?

पुदिन्याच्या पानांमध्ये मेन्थॉलचे प्रमाण जास्त असते. जर ही पाने बारीक करून लावली तर त्वचेला ताजेपणा येतो. तसेच ही पाने ब्लड सर्कुलेशन वाढवतात. त्यामुळे चेहऱ्यावर डलनेस दिसत नाही. एवढेच नाही तर अँटीऑक्सिडंट्सच्या मदतीने ते त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवते. त्यामुळे चेहरा एकदम फ्रेश आणि सुंदर दिसतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग