Muskmelon for Skin: खरबूजची साल फेकू नका, अशा प्रकारे स्किन केअर मध्ये वापरा, फायदा होईल-how to use muskmelon peel for skin care ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Muskmelon for Skin: खरबूजची साल फेकू नका, अशा प्रकारे स्किन केअर मध्ये वापरा, फायदा होईल

Muskmelon for Skin: खरबूजची साल फेकू नका, अशा प्रकारे स्किन केअर मध्ये वापरा, फायदा होईल

May 12, 2024 07:38 PM IST

Skin Care With Muskmelon: जर तुम्हाला खरबूज खायला आवडत असेल आणि उन्हाळ्यात ते खूप खात असाल तर त्यांची साल फेकून देऊ नका. त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी याला स्मार्ट पद्धतीने वापरा.

स्किन केअरलाठी खरबूजच्या सालचा वापर
स्किन केअरलाठी खरबूजच्या सालचा वापर (unsplash)

Muskmelon Peel For Skin Care: उन्हाळा चांगलाच तापू लागला आहे. या काळात बाजारात खरबूजांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. ही रसदार फळे खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे होतात. हे फळ फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. सहसा खरबूज खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देतात. तर जाणून घ्या ही सालं तुमची त्वचा कशी सुंदर बनवू शकतात. ही रेमेडी कळल्यानंतर तुम्ही सुद्धा खरबूजचे साल फेकणे बंद कराल. चला तर मग जाणून घेऊया स्किन केअरसाठी खरबूजची साल कशी वापरावी.

खरबूज पासून बनवा फेस पॅक

उन्हाळ्यात चेहऱ्यावर कोरडेपणा हे डिहायड्रेशनचे लक्षण असते. अनेक वेळा हा कोरडेपणा मॉइश्चरायझर देऊनही जात नाही. अशा वेळी खरबूज मॅश करा, त्यात दही आणि थोडीशी ओट्स पावडर मिक्स करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून ठेवा आणि २० मिनिटांनी हलक्या हाताने मसाज करून पाण्याने धुवा. या फेस पॅकमुळे चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होतो. हे प्रदूषण आणि अतिनील किरणांमुळे होणारे त्वचेचे नुकसान देखील टाळते.

खरबूज वृद्धत्व थांबवते

खरबूजची साल घ्या, त्यावर मध लावून थेट चेहऱ्याला चोळा. यामुळे त्वचेवरील फाइन लाइन्स दूर होतील आणि त्वचेला लवचिकताही मिळेल. खरबूज एजिंग होण्यापासून थांबवते.

केस होतील मऊ

केस मऊ आणि चमकदार बनवायचे असतील तर खरबूजच्या सालीची पेस्ट बनवा. नंतर त्यात खोबरेल तेल मिक्स करा. आता ही पेस्ट केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा. साधारण अर्धा तास तसंच राहू द्या. नंतर सौम्य शॅम्पूने धुवा. यामुळे केस मजबूत होतील आणि ते रेशमी चमकदार देखील होतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner