Moringa Flower: बाजारात अनेक भाज्या उपलब्ध आहेत. प्रत्येकाची खासियत वेगळी, त्याचे गुणधर्म, फायदे वेगवेगळे असतात. अशी एक भाजी आहे ज्याबद्दल सगळ्यांना माहिती नाही. या दिवसात तुम्हाला शेग्याची शेंग भरपूर प्रमाणात बाजारात दिसेल. पण तुम्हाला माहित आहे का की याची पान आणि फुलेही खूप फायदेशीर ठरतात. याच्या फुलांची भाजी शरीरातील साखर संतुलित करण्यास उपयुक्त ठरते. याशिवाय या भाजीमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि फायबर असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे फुल केस गळतीवरही नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. तर सर्वप्रथम आपण केसांसाठी मोरिंगाचे फुल अर्थात शेवग्याचे फुल कसे वापरावे हे जाणून घेऊयात. याशिवाय याचे फायदेही जाणून घेऊयात.
केसांसाठी शेवग्याच्या फुलांचा वापर करण्यासाठी तुम्ही त्याचं तेल वापरू शकता. इतकंच नाही तर तुम्ही ही फुल बारीक करून हेअर पॅक बनवून केसांना लावू शकता.
> तिळाच्या तेलात शेवग्याची फुले शिजवा आणि नंतर हे तेल गाळून घ्या. हे तेल लावून केसांना मसाज करा. असे केल्याने तुमच्या केसांमधील रक्ताभिसरण उत्तम होईल आणि केस मुळांपासून मजबूत होऊन केस गळणे थांबेल.
> याशिवाय शेवग्याची फुले बारीक करून त्यात कोरफडीचे जेल घाला. नंतर हे दोन्ही मिक्स करून तुमच्या टाळूला लावा. यामुळे केस मुळांपासून मजबूत होतील आणि केस गळण्यास प्रतिबंध होईल.
> याशिवाय तुम्ही शेवग्याची फुलांची वापर नैसर्गिक कंडिशनर म्हणून करू शकता. हे नवीन केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
> याशिवाय शेवग्याच्या फुलांचा चहा बनवू शकता, जे पिल्याने केस गळणे थांबते. याशिवाय, हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.
शेवग्याची फुले केसांच्या कूपांना मजबूत करते आणि केस गळणे थांबवते. याशिवाय, त्यातील अँटिऑक्सिडंट्स केसांमधील रक्ताभिसरणाला गती देतात, ज्यामुळे केसांची स्थिती सुधारते, केसांचे पोषण होते आणि केस आतून मजबूत होतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)