Hair Care Tips: फ्रिजी हेअर सिल्की आणि शाइनी बनवण्यासाठी अशा प्रकारे लावा दुधाची साय!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Care Tips: फ्रिजी हेअर सिल्की आणि शाइनी बनवण्यासाठी अशा प्रकारे लावा दुधाची साय!

Hair Care Tips: फ्रिजी हेअर सिल्की आणि शाइनी बनवण्यासाठी अशा प्रकारे लावा दुधाची साय!

Jun 23, 2024 11:26 AM IST

Hair Care With Milk Cream: केसांवर दुधाची साय वापरल्याने केसांच्या समस्या तर दूर होतातच शिवाय घरबसल्या केस स्ट्रेट होऊ शकतात. जाणून घ्या केसांवर दुधाची साय लावण्याचे फायदे आणि पद्धत

सिल्की आणि शाइनी केसांसाठी दुधाच्या सायची रेमेडी
सिल्की आणि शाइनी केसांसाठी दुधाच्या सायची रेमेडी

Milk Cream Remedy to Get Silky and Shiny Hair: आजकाल महिलांमध्ये स्ट्रेट केसांची फॅशन खूप ट्रेंडी आहे. वेवी हेअर असलेल्या मुलीही पार्लरमध्ये जाऊन केस स्ट्रेट करण्यासाठी विविध प्रकारचे ब्युटी ट्रीटमेंट घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मात्र हे ब्युटी ट्रीटमेंट खर्चिक असून काही काळानंतर केसांचे नुकसान होऊन केस गळणे आणि फ्रिजी हेअरचे कारण बनू लागते. जर तुम्हीही फ्रिजी हेअर आणि कोंडा सारख्या केसांच्या समस्येने त्रस्त असाल तर महागड्या ब्युटी ट्रीटमेंटऐवजी केसांना फ्रेश मिल्क क्रीम लावा. केसांवर दुधाच्या सायचा वापर केल्याने केसांच्या समस्या तर दूर होतातच शिवाय घरी बसून केस स्ट्रेट होऊ शकतात. केसांवर दुधाची साय कशी लावण्याची पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घ्या.

केसांना दुधाची साय लावण्याचे फायदे

हेअर कंडिशनर

कोरडे, कुरळे केस कॅरी करणे थोडे अवघड असते. पण फ्रेश क्रीम मुळे केसांच्या अशा समस्यांना सामोरे जाण्यास मदत होते. दुधाची साय केसांना पोषण आणि मॉइश्चरायझ करण्यास मदत करते. यात असलेले लॅक्टिक अॅसिडचे नैसर्गिक ह्युमेक्टेंट गुणधर्म आतील ओलावा सील करण्यास मदत करतात.

केस गळणे

हेअर फॉलिकल्स कमकुवत झाल्यामुळे अनेकदा केस गळण्याची समस्या उद्भवते. अशावेळी केसांना दुधाची साय लावल्याने त्यांना योग्य प्रकारे कंडिशन आणि पोषण मिळाल्यास केस गळती कमी होते. ज्यामुळे केस रुक्ष आणि खराब होण्यापासून वाचतात.

चमकदार केस

दुधाच्या सायमध्ये असलेल्या फॅटचे प्रमाण केसांमध्ये नैसर्गिक चमक निर्माण करते. यामध्ये असणारा मॉइश्चरायझिंग गुणधर्म ओलावा देऊन केस मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत करतो.

केस मजबूत करते

मिल्क क्रीममध्ये असलेल्या प्रथिनांचे प्रमाण केस मजबूत करून केस तुटण्याची आणि नुकसान होण्याची शक्यता कमी करते. केस निरोगी ठेवण्यासाठी व्यक्तीने केसांवर हीट स्टायलिंग टूल्सचा वापर कमीत कमी केला पाहिजे. असे केल्यानंतर केसांना दुधाची साय अवश्य लावा.

कोंडा

मिल्क क्रीममध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड कोंडा कमी करते आणि केसांच्या मुळांचे नुकसान होण्यापासून वाचवते.

केसांना दुधाची साय कशी लावावी

केसांना लावण्यासाठी तुम्ही फ्रेश क्रीम देखील वापरू शकता. हा उपाय करण्यासाठी दुधाची साय थेट केसांवर थोडा वेळ लावून ठेवा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. याशिवाय तुम्ही तुमच्या आवडत्या हेअर मास्क किंवा कंडिशनरसोबत देखील साय मिक्स करू शकता.

केसांना स्ट्रेट बनवण्यासाठी असे वापरा दुधाची साय

हा हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ बारीक करून बाजूला ठेवावा. आता एका बाऊलमध्ये तांदळाचे पीठ, दुधाची साय आणि लिंबाचा रस मिक्स करून सर्व काही नीट मिक्स करा. ही पेस्ट तयार झाल्यावर काही वेळ फुगायला ठेवावी. आता हे मिश्रण हातांच्या साहाय्याने वरून खालपर्यंत संपूर्ण केसांमध्ये लावा आणि तासभर ठेवा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner