Makhana For Weight Loss: या वेळी खा मखाना, वजन कमी होण्यास होईल मदत!-how to use makhana for weight loss ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Makhana For Weight Loss: या वेळी खा मखाना, वजन कमी होण्यास होईल मदत!

Makhana For Weight Loss: या वेळी खा मखाना, वजन कमी होण्यास होईल मदत!

Mar 03, 2024 03:48 PM IST

Weight Loss Diet: वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये असाल तर आहारात मखानांचा समावेश करा. पण त्याआधी मखाना खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत जाणून घ्या.

how to use Makhana for weight loss
how to use Makhana for weight loss (Pixabay )

Weight Loss Foods: वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये आहार फार महत्त्वाचा असतो. काय खातोय, किती खातोय? कोणत्या वेळी आणि कोणत्या पद्धतीने खातोय याची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हीही वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये असाल तर तुमच्या डाएटमध्ये मखानांचा समावेश करा. जर माखनाचा आहारात योग्य प्रकारे समावेश केला गेला तर ते वजन कमी करण्यात आश्चर्यकारक प्रभाव जाणवतो. ५० ग्रॅम मखानामध्ये अंदाजे १८० कॅलरीज असतात. त्याच वेळी, मखानांचामध्ये सोडियम किंवा सॅच्युरेटेड फ्ट्स नसतात. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी मखाना एक चांगला नाश्ता आहे. चला जाणून घेऊयात मखनाचे सेवन कसे आणि कोणत्या वेळी करावे.

कोणती वेळ आहे योग्य?

मखाना खाण्याची उत्तम वेळ म्हणजे मध्य-सकाळी किंवा संध्याकाळ. यावेळी,मखाना तुम्ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात. तुम्ही मखानासोबत एक कप ग्रीन टी किंवा दुधाचा चहा घेऊ शकता. मखाना तसाच खाता येत नाही. त्यामुळे हलकासा परतून घ्या. पण लक्षात घ्या त्यात वरून मीठ किंवा मसाले घालू नका. एक वाटी भाजलेला मखना खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. मखनस कढईत साधे परतून किंवा तुपात परतून खा.

Jaggery: रोज रात्री झोपण्यापूर्वी खा गूळ, या आजारांपासून राहाल दूर!

कोणते फायदे मिळतात?

> मखानामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तसेच प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण देखील चांगले असते जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रभावी आहे.

> यकृत डिटॉक्स करण्यासाठीही मखाना फायदेशीर आहे. मखाना खाल्ल्याने यकृताचे आरोग्य सुधारते.

> मखानाचे सेवन केल्याने रक्तदाब कमी होण्यासही फायदा होतो. मखानामधील कमी चरबी आणि सोडियम रक्तदाब नियंत्रित करतात.

Rheumatoid Arthritis Awareness Day 2024: संधिवाताच्या रुग्णांनी आहारात या पदार्थांचा समावेश करावा!

> मधुमेहाच्या आहारातही मखानांचा समावेश करता येतो. मखनाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे साखरेची पातळी कमी करण्यात प्रभावी आहे.

> मखानामध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे ते शरीराला अकाली वृद्धत्व टाळते.

> ग्लूटेन फ्री असल्याने मखनाला ग्लूटेन फ्री आहाराचा भाग बनवता येतो.

Benefits Of Raw Turmeric: एक-दोन नव्हे तर अनेक समस्या कच्च्या हळदीने होतात दूर, जाणून घ्या फायदे!

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)