पावसाळा सुरु झाला आहे. या ऋतूमध्ये अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळणे, पालेभाज्या खाणे बंद करणे, पाणी पिताना उकळून पिणे अशा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आरोग्यासोबतच घरातील वस्तूंची देखील योग्य ती काळजी घ्यावी लागते. किचन गार्डनमध्ये असलेल्या रोपांची या ऋतूमध्ये विशेष काळजी घेतली जाते. त्यांना जास्त पाणी देणे टाळले जाते. कधीकधी त्यांना ऊन मिळत नाही. अशा वेळी कोणते खत घालावे असा देखील प्रश्न पडतो.
किचन गार्डनमध्ये टोमॅटो, कोथिंबीर अशी झाडे लावली तर ती अन्नासाठी वापरली जातात. त्यामुळे स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून तयार केलेले सेंद्रिय खत त्यांना घातले तर फुलझाडे लवकर बहरतात. काही फळझाडांना फळे येतात. अशा वेळी किचनमधील कोणत्या पदार्थांमुळे रोपांना खत मिळेल चला जाणून घेऊया.
वाचा: कुठे श्वानाची पूजा होते तर कुठे बुलेट गाडीची, वाचा भारतातील अनोख्या मंदिरांविषयी
चहा पिवून झाल्यानंतर उरलेली चायपत्ती फेकून देण्याऐवजी एका भांड्यात ठेवा. सेंद्रिय खत तयार करण्यासाठी तिचा वापर केला जाऊ शकतो. या पत्तीचा वापर करुन सर्वोत्तम आणि सोपे खत तयार होते. ही चायपत्ती तुम्ही थेट झाडांच्या मुळालात टाकू शकता.
एका बाटलीत कांद्याची साल भरून त्यासोबत पाणी घाला. सुमारे 15 मिनिटे ठेवा आणि नंतर खत म्हणून झाडात घाला. हे सल्फरयुक्त खत वनस्पतींना जमिनीतील सर्व पोषक द्रव्ये शोषून घेण्यास मदत करेल. या कांद्याच्या सालीचे पाणी आपण जवळजवळ सर्व वनस्पतींमध्ये घालू शकता.
वाचा: पावसाळ्यात त्वचेवर पिंपल्स येत आहेत? ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन पाहा
केळीची साल एका भांड्यात दहा दिवस ठेवावी. नंतर ती मातीत घालावी. केळीच्या सालींमध्ये फॉस्फरस आणि इतर सूक्ष्म पोषक घटक असतात. ज्यामुळे रोपाची वाढ आणि फळे सहज होण्यास मदत होते.
वाचा: रोजच्या आहारात चिया सीड्सचा करा समावेश, राहा आजारांपासून लांब
रोपे वेगाने वाढावीत यासाठी खत द्यायचे असेल तर अंड्याचे कवच घालू शकता. या सालीचे तुकडे करुन मातीत टाकावेत. त्यामुळे रोपांची वाढ वेगाने होते.