Skin Care With Ghee: हिवाळा सुरु झाला की त्वचा आणि केसांच्या समस्या वाढू लागतात. हिवाळ्यात हवेत आर्द्रतेचा अभाव असतो. त्यामुळे जास्त कोरडेपणा येतो. काही लोकांची त्वचा जास्त प्रमाणात कोरडी होते. काहींना त्वचा फाटण्याची समस्या देखील होते. अशा वेळी बाजारात मिळणारे विविध क्रीम्स, लोशन वापरले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का घरी सहज उपलब्ध असणारे तूप तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी महागड्या क्रीम्सऐवजी तुम्ही घरातील तूप सहज वापरू शकता. जाणून घ्या त्वचेवर तूप कसे वापरावे.
आजकाल बहुतेक लोकांना डोळ्यांखाली काळ्या वर्तुळाचा म्हणजेच डार्क सर्कल्सचा त्रास होतो. त्यामुळे तुमचा लूक खराब होतो. हे डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुपाचा वापर करावा. ते लावण्यासाठी एक लहान थेंब घ्या आणि हळूहळू डोळ्यांखाली मालिश करा.
तुपात व्हिटॅमिन ए आणि फॅटी अॅसिड असते. हे नैसर्गिक मॉइश्चरायझरचे काम करते. आंघोळीपूर्वी किंवा नंतर त्वचेवर मॉइश्चरायझर म्हणून तूप वापरू शकता. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. याचा रोज वापर केल्याने त्वचेवर चमक येते.
हिवाळ्यात ओलावा नसल्यामुळे ओठ फाटू लागतात. अशा परिस्थितीत जेव्हा ओठ कोरडे होऊ लागतात आणि त्यावर ड्रायनेसची लेअर तयार होऊ लागते तेव्हा तुम्ही तूप वापरू शकता. हे म्यूकस मेम्ब्रेनला आराम देते. या समस्येचा सामना करण्यासाठी दररोज तुपाने मसाज करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)