Dark Cicles Remove: डार्क सर्कलच्या समस्येने त्रस्त? लावा हा प्रभावी होममेड पॅक, दिसेल फरक-how to use flaxseed powder pack to remove dark circles under eyes effective home remedies ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dark Cicles Remove: डार्क सर्कलच्या समस्येने त्रस्त? लावा हा प्रभावी होममेड पॅक, दिसेल फरक

Dark Cicles Remove: डार्क सर्कलच्या समस्येने त्रस्त? लावा हा प्रभावी होममेड पॅक, दिसेल फरक

Mar 18, 2024 11:23 AM IST

Homemade Pack for Dark Circles: डोळ्यांखालील डार्क सर्कल्स खूप खराब दिसतात. त्यामुळे हे दूर करण्यासाठी योग्य संतुलित आहारासोबत घरगुती उपाय देखील प्रभावी ठरतात. डार्क सर्कल दूर करण्यासाठी कोणत्या पॅक लावता येतो ते जाणून घ्या.

डार्क सर्कल दूर करण्यासाठी घरगुती पॅक
डार्क सर्कल दूर करण्यासाठी घरगुती पॅक (unsplash)

Flaxseeds Powder Pack to Remove Dark Circles: अपूर्ण झोप असो किंवा सतत स्क्रीनवर काम करणे यामुळे डार्क सर्कलची समस्या अनेकांना सतावत असते. खरं तर डार्क सर्कल होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. अपुरी झोप, स्क्रीन टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटरचा सतत वापर, जीवनसत्त्वांची कमतरता, अशी अनेक कारणांमुळे डार्क सर्कलची समस्या होऊ शकते. तर काही लोकांना अनुवांशिक डार्क सर्कल असतात. ही काळी सर्कल दूर होऊ शकतात. फक्त तुम्हाला काही उपाय फॉलो करतील. तुम्हाला सुद्धा डार्क सर्कल दूर करून तुमचे सौंदर्य खुलवायचे असेल तर हे उपाय पाहा.

डार्क सर्कल दूर करण्याचे उपाय

झोप न लागल्यामुळे किंवा सतत स्क्रीन वापरल्यामुळे डार्क सर्कल होत असतील तर यासाठी पुरेशी झोप आणि स्क्रीन कमी वापरणे हाच उपाय आहे.किंवा तुम्ही स्क्रीन लाइट कमी करून नाईट मोड वापरू शकता.

सकस आहारही महत्त्वाचा

आवश्यक जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे सुद्धा डार्क सर्कल होतात. त्यामुळे असे डार्क सर्कल दूर करण्यासाठी हेल्दी आणि संतुलित आहार घ्या ज्यामध्ये व्हिटॅमिन ए, ई आणि सी यांचा समावेश असेल. त्यामुळे डोळ्यांखाली दिसणारी काळी वर्तुळे दूर होऊ लागतात.

करा हा घरगुती उपाय

जर तुम्हाला सतत डार्क सर्कलचा त्रास होत असेल तर हा घरगुती उपाय करा.हे करण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी आवश्यक आहेत -

- एक चमचा फ्लेक्ससीड पावडर

- एक चतुर्थांश चमचा हळद

- अर्धा चमचा दही

हे बनवण्यासाठी प्रथम जवसाच्या बिया हलक्या भाजून बारीक करा. नंतर ते नीट गाळून घ्या. जेणेकरून त्यातील जाडसरपणा निघून जाईल. आता या पावडरमध्ये एक चतुर्थांश चमचा हळद घाला आणि नंतर दही घालून चांगले फेटून घ्या. ही पेस्ट डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. त्यानंतर साधारण अर्ध्या तासानंतर स्वच्छ करा. या पॅकमुळे त्वचेतील काळेपणा दूर होण्यास मदत होईल. याचा नियमित वापर केल्यास तुम्हाला फरक दिसून येईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner