Skin Care With Cucumber: उन्हाळ्यात कडक उन्हामुळे त्वचा बऱ्याच अंशी निस्तेज होते. या ऋतूत त्वचेला हायड्रेट करणं खूप गरजेचं आहे. त्वचा हायड्रेट करण्यासाठी तुम्ही भरपूर पाणी आणि फळांचा रस पिऊ शकता. याशिवाय निस्तेज त्वचा तजेलदार बनवण्यासाठी काकडीचा वापर केला जाऊ शकतो. काकडीत अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात. जे आरोग्यासोबतच त्वचेला अनेक फायदे देऊ शकतात. उन्हाळ्यात त्वचेवर काकडी कशी वापरावी ते जाणून घ्या.
काकडीचा वापर टोनर म्हणून करता येतो. हे करण्यासाठी काकडी नीट धुवून स्वच्छ करा. नंतर ते किसून त्याचा रस पिळून घ्या. आता रस एका स्प्रे बॉटलमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा. दररोज चेहरा धुतल्यानंतर हे वापरा.
तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवणाऱ्या डार्क सर्कलचा सामना करण्यासाठी तुम्ही काकडीचा वापर करू शकता. यासाठी काकडी धुवून त्याचे तुकडे करा आणि थंड होण्यासाठी काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर २० मिनिटे डोळ्यांवर ठेवा. दररोज असे केल्याने डोळ्यांखालील काळे डाग दूर होण्यास मदत होईल.
तुम्ही काकडीच्या मदतीने फेस पॅक तयार करू शकता. यासाठी प्रथम काकडी किसून घ्या आणि नंतर त्यात एलोवेरा जेल घाला. ते चांगले मिक्स करून घ्या. ही पेस्ट स्वच्छ चेहऱ्यापासून मानेपर्यंत लावा. काही वेळ तसेच राहू द्या आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)