Buttermilk for Hair: केस धुण्यासाठी अशा प्रकारे वापरा ताक, हेअर प्रॉब्लेमला करा सुट्टी-how to use buttermilk to get rid of grey and weak hair know its benefits ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Buttermilk for Hair: केस धुण्यासाठी अशा प्रकारे वापरा ताक, हेअर प्रॉब्लेमला करा सुट्टी

Buttermilk for Hair: केस धुण्यासाठी अशा प्रकारे वापरा ताक, हेअर प्रॉब्लेमला करा सुट्टी

May 14, 2023 11:21 AM IST

Buttermilk Benefits for Hair: जर तुम्हीही केस गळणे किंवा पांढरे होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर ताकाचे या उपायाचा अवलंब करून तुमची समस्या दूर होऊ शकते. ताकाने केस धुतल्याने तुम्हाला काय फायदे होतील जाणून घ्या.

केसांसाठी ताकाचे फायदे
केसांसाठी ताकाचे फायदे (healthshots)

How to Use Buttermilk to Get Rid of Hair Problems: केसांना सुंदर आणि मजबूत बनवण्यासाठी लोक पार्लरच्या महागड्या हेअर ट्रीटमेंट पासून हेअर केअर प्रोडक्ट्स खरेदी करण्यास मागे हटत नाहीत. असे असूनही कमी वयात केस पांढरे होऊ लागतात किंवा केस गळतीबरोबरच कोंड्याची समस्याही निर्माण होऊ लागते. जर तुम्हीही केस गळणे किंवा पांढरे होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर ताकाचा हा उपाय अवलंबून तुमची समस्या दूर होऊ शकते. ताकाने केस धुण्याचे काय फायदे आहेत आणि ते वापरण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते जाणून घेऊया.

Remedies for Dandruff: डँड्रफपासून सुटका हवी? अशा प्रकारे केसांना लावा खोबरेल तेल

ताकामध्ये असलेले पोषक घटक

ताकामध्ये लॅक्टिक अॅसिड, कर्बोदके, प्रथिने, व्हिटॅमिन ए, डी आणि बी १२, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात, जे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. ताक केसांना पुरेसे पोषण देऊन केसांशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. ताक केसांवर वापरल्याने केस लांब, दाट आणि काळे होतात. एवढेच नाही तर टाळू स्वच्छ ठेवण्यासही ताक मदत करते. ताकातील प्रथिने केसांना रेशमी आणि चमकदार बनवण्यास मदत करतात.

Hair Mask: केसांना हेअर मास्क लावण्याची काय आहे पद्धत? जाणून घ्या योग्य स्टेप्स

ताकाने केस धुण्याचे फायदे

केस गळणे

केस मजबूत ठेवण्यासाठी प्रथिनांची गरज असते. ताकामध्ये प्रथिने पुरेशा प्रमाणात असतात, ज्यामुळे केसांचे पोषण होते आणि त्यांची मुळे मजबूत होतात. त्यामुळे केस गळतीची समस्याही दूर होते.

पांढऱ्या केसांची समस्या

आजकाल केसांवर केमिकल ट्रीटमेंट आणि शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे लोकांचे केस लहान वयातच पांढरे होऊ लागतात. तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर केस काळे करण्यासाठी ताक वापरा. ताकाने केस धुतल्याने केस पांढरे होण्याची समस्या दूर होते. हा उपाय करण्यासाठी साधारण ७-८ कढीपत्ता बारीक करून त्यात ताक मिसळून केस आणि मुळांना लावा. अर्ध्या तासानंतर केस पाण्याने धुवा.

कोंडा दूर करा

केस गळण्यामागे कोंडा हे देखील एक प्रमुख कारण आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी केस ताकाने धुवा. ताकामध्ये असलेले पोषक तत्व टाळूची खाज आणि कोंडा होण्याची समस्या दूर करण्यास मदत करतात.

Straight Hair: कोणत्याही डॅमेजशिवाय घरीच मिळतील स्ट्रेस केस, फक्त फॉलो करा या होम रेमेडीज

ताकाने केस कसे धुवावे

ताकाने केस धुण्यासाठी ताकामध्ये अंडी, कढीपत्ता, केळी मिक्स करून केसांना लावा. ताकाचा हा हेअर पॅक केसांवर आणि मुळांवर लावा आणि ३० मिनिटे ठेवा. नंतर केस धुवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग