Hair Growth: केस लवकर वाढवायचे आहेत? केसांवर या पद्धतीने लावा काळी मिरी, दिसेल परिणाम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Growth: केस लवकर वाढवायचे आहेत? केसांवर या पद्धतीने लावा काळी मिरी, दिसेल परिणाम

Hair Growth: केस लवकर वाढवायचे आहेत? केसांवर या पद्धतीने लावा काळी मिरी, दिसेल परिणाम

May 30, 2024 12:04 PM IST

Black Pepper for Hair: जर तुम्हाला केस गळतीचा त्रास होत असेल आणि डोक्यावरील केस खूप पातळ आणि विरळ झाले असतील तर काळ्या मिरीपासून बनवलेले टोनर वापरून पहा. केसांची ग्रोथ पुन्हा वाढेल.

केसांच्या वाढीसाठी काळी मिरी वापरण्याची पद्धत
केसांच्या वाढीसाठी काळी मिरी वापरण्याची पद्धत (unsplash)

Ways to Use Black Pepper for Hair Growth: काळी मिरी मसाला म्हणून बहुतांश घरांमध्ये वापरली जाते. घसादुखी आणि सर्दीमध्ये काळ्या मिरीचा काढा पिणे देखील फायदेशीर आहे. पण केवळ आरोग्यच नाही तर काळ्या मिरीच्या मदतीने तुम्ही तुमचे केसही निरोगी बनवू शकता. विशेषत: टाळूवर केस न वाढल्याने दिसणारे टक्कल दूर करायचे असेल तर काळी मिरी वापरा. केसांवर काळी मिरी वापरल्याने फक्त केसांची वाढच होणार नाही तर कोड्यांची समस्या देखील दूर होते. चला तर मग जाणून घ्या केसांवर कशी लावावी काळी मिरी पावडर, ज्याने केसांची ग्रोथ वाढेल.

काळ्या मिरीमध्ये असतात केस वाढवणारे घटक

काळ्या मिरीमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असते. त्यात कोरोनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स, फॉलिक ॲसिड, पोटॅशियम सारखे अनेक घटक देखील असतात. हे केवळ टाळूवरील केसांची पुन्हा वाढ करण्यास मदत करत नाही तर कोंडा देखील दूर करते. केसांवर काळी मिरी लावण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे काळी मिरी टोनर. ज्यामुळे स्काल्प मजबूत होण्यास आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. काळी मिरी टोनर कसा बनवायचा ते जाणून घ्या

काळी मिरी टोनर कसा बनवायचा

काळी मिरी टोनर बनवण्यासाठी फक्त दोन गोष्टी आवश्यक आहेत -

- एक लिटर पाणी

- २५ ग्रॅम काळी मिरी

काळी मिरीचे टोनर बनवण्यासाठी प्रथम एका पॅन किंवा भांड्यात एक लिटर पाणी घाला. गॅसवर ठेवा आणि सुमारे २५ ग्रॅम काळी मिरी घेऊन बारीक वाटून घ्या किंवा पावडर बनवा. आता ही पावडर पाण्यात टाकून शिजवून घ्या. ते एक चतुर्थांश कमी होईपर्यंत शिजवा. आता हे तयार झालेले काळी मिरीचे एक चतुर्थांश पाणी गाळून स्प्रे बॉटल मध्ये भरून घ्या.

कसा लावायचा काळी मिरी टोनर

केसांना काळी मिरी टोनर लावण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांवर लावा. नंतर सकाळी पाण्याने धुवा. आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा हा टोनर लावल्याने काही आठवड्यांनी केसांच्या वाढीत फरक दिसेल आणि नवीन केस येण्यास सुरुवात होईल. याशिवाय डोक्यातील कोंडाही दूर होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner