मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beet Juice: बीटरूट केसांचा सुधारू शकतो रंग, कसा करायचा वापर जाणून घेऊयात!

Beet Juice: बीटरूट केसांचा सुधारू शकतो रंग, कसा करायचा वापर जाणून घेऊयात!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 24, 2024 01:02 PM IST

Beet Juice for Gray Hair: लहान वयातच, अकाली केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना सतावत असते. यावर तुम्ही घरगुती उपाय करू शकता.

how to use Beetroot for hair color
how to use Beetroot for hair color (Unsplash)

Hair Colour: केसांच्या समस्यावर बाहेरून ट्रीटमेंट घेणे धोकादायक ठरू शकते. केमिकलयुक्त प्रॉडक्टस केसांच्या समस्या कमी करण्यापेक्षा अनेकदा वाढवतात. तुम्ही यासाठी घरगुती उपाय करू शकता. आपण बीटरूटचा वापर केसांसाठी अनेक प्रकारे करू शकतो. ही एक फळभाजी आहे जी केसांचा रंग वाढवू शकते याशिवाय टाळूचे पोषण करण्यास आणि रक्ताभिसरणाला गती देण्यासही मदत करते. बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि कॅरोटीनसारखे अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात. त्यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास आणि केस पांढरे होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात. इतकेच नाही तर तुम्ही बीटरूटचा वापर नैसर्गिक केसांचा रंग म्हणूनही करू शकता. या दोन्ही प्रभावी पद्धतीबद्दल जाणून घेऊयात.

गाजर, साखर बीटरूट रस

> साखर बीटरूटचा रंग अधिक डीप आणि लांब ठेवण्यास मदत करते.

> बीटरूटचा रस, गाजरचा रस आणि २ चमचे साखर मिसळा.

> गुळगुळीत पेस्ट बनवण्यासाठी मिश्रण गरम करा.

> वापरायला सोपे होण्यासाठी, हे मिश्रण थोडे पातळ करा.

> नंतर केसांना लावा.

> १ तास केसांवर राहू द्या आणि नंतर केस धुवा.

बीटरूटचा रस आणि खोबरेल तेल

> बीटरूट बारीक करून त्याचा रस काढा.

> आता या रसात ३ चमचे खोबरेल तेल घाला.

> हे मिश्रण केसांना लावा आणि तासभर तसंच राहू द्या.

> जर तुम्हाला गडद रंग हवा असेल तर २ तास राहू द्या.

> तुमचे केस पाण्याने धुवा आणि तुम्हाला दिसेल की तुमच्या केसांचा रंग सुधारला आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग