Bay Leaf for Hair Care: केस गळणे कोणालाही आवडत नाही. सतत केस गळल्यामुळे डोक्यावरचे केस कमी होतात, जे अजिबात चांगले दिसत नाही. कोंडा आणि त्यामुळे होणारी खाज यामुळे सुद्धा खूप त्रास होतो. जर तुम्ही केसांच्या अशा समस्यांशी लढत असाल तर काही दिवस तमालपत्राची ही रेमेडी वापरून पहा. याच्या मदतीने सतत होणारी केसगळती आणि कोंडा थांबवता येतो. तमालपत्र कसे वापरावे ते जाणून घ्या.
केस गळणे थांबवण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. पण जर तुम्हाला घरगुती उपाय करायचा असेल तर ही पद्धत तुम्हाला मदत करू शकते.
हेअर टॉनिक बनवण्यासाठी तीन ते चार गोष्टींची आवश्यकता असेल.
-१५-२० तमालपत्र
- १०-१५ जास्वंदाची फुले
- १०-१५ कडुनिंबाची पाने
- १०-१५ तुळशीची पाने
या सर्व गोष्टी एक ते दीड लिटर पाण्यात टाका आणि चांगले उकळा. पाणी अर्धे होईपर्यंत हे उकळा. हे पाणी थंड झाल्यावर स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये गाळून घ्या. तुमचे हेअर टॉनिक तयार आहे.
रोज रात्री झोपण्यापूर्वी हे टॉनिक केसांच्या मुळांवर स्प्रे करून असेच राहू द्या. हे टॉनिक रोज लावल्याने कोंडा आणि स्काल्पची खाज काही दिवसातच निघून जाईल. शिवाय नवीन केसही वाढू लागतील. तर जास्वंदाची फुले केसांना चमक देतात आणि ते रेशमी बनवतात
तमालपत्रामध्ये अनेक गुणधर्म आहेत, जे केसांना हेल्दी ठेवतात. तमालपत्रामध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात. जे केसांच्या मुळांमध्ये असलेले फंगस आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते. याशिवाय कोंडा दूर होण्यासही मदत होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या