Tips to Turn a Steel Pan to Non-Stick Pan: अनेकदा स्टीलच्या पॅनमध्ये जेवण बनवताना घरातील महिला तक्रार करतात की अन्न तळाशी चिकटते आणि जळते. स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना तुमची सुद्धा अशीच तक्रार असेल, तर आता तुमची ही समस्या सुटेल. मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मजेदार किचन हॅक शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की तुम्ही अगदी सहजपणे स्टीलचे पॅन नॉन-स्टिक बनवू शकता. कसे ते येथे जाणून घ्या.
स्टीलचे पॅन नॉन-स्टिक बनवण्यासाठी प्रथम स्टीलचे पॅन पूर्ण गरम करा आणि त्यावर थोडे पाणी शिंपडा. शिंपडल्यानंतर पाण्याचे थेंब जर ड्रॉपलेटसारखे तरंगताना दिसले किंवा तळाशी उसळणाऱ्या मणीसारखे दिसले तर भांडे गरम झाले आहे असे समजावे. यानंतर पॅनमध्ये तेलाचे २-३ थेंब टाका आणि टिश्यू पेपरच्या मदतीने संपूर्ण पॅनवर पसरवा. तुमचे स्टील पॅन नॉन-स्टिक पॅन म्हणून तयार आहे.
आता तुमच्या स्टीलच्या भांड्यांना अन्न चिकटणार नाही आणि ते नॉन-स्टिकसारखे काम करेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या