Republic Day Importance: २६ जानेवारी ही आपल्या भारत देशाच्या इतिहासातील किती महत्त्वाची तारीख आहे हे वेगळं सान्गायची गरज नाही. पण आपल्या नवीन पिढीला आपल्या लहानग्यांना याची जाणीव करून देते गरजेचे आहे. आजच्या मुलांना या दिवसाची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांच्यात देशाप्रती असलेले प्रेम, आदर, जागरूकता आणि आस्था वाढवण्यासाठी त्यांचे महत्त्व शिकवले पाहिजे. पण त्यांना ही गोष्ट कशी सांगयची? (Parenting Tips) जेणेकरून ते सर्व गोष्टी आनंदाने ऐकतील आणि भविष्यात त्यांच्या देशाचा आदर करतील, राष्ट्रध्वज फडकावतील आणि राष्ट्रगीत गाऊन २६ जानेवारी साजरा करतील. चला जाणून घेऊयात मुलांना २६ जानेवारीचे महत्त्व कशा प्रकारे शिकवावे...
> सर्वप्रथम मुलांना प्रजासत्ताकचा अर्थ समजावून सांगा.
> मुलांना आवर्जून देशासाठी बलिदान देणाऱ्या देशाच्या शूर सैनिक आणि सैनिकांच्या कथा सांगा.
> मुलांना राष्ट्रगीताचे महत्त्व, त्यातील शब्दांचा अर्थ समजावून सांगा.
> टीव्हीवर परेडचे थेट प्रक्षेपण मुलांना दाखवा आणि सर्व राज्यांच्या प्रेझेंटेशनचे महत्त्व समजावून सांगा.
> मुलांसह आपल्या सोसायटीमध्ये किंवा एरियात राष्ट्रध्वज फडकावा.
> मुलांना सांगा की पहिला प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी १९५० रोजी साजरा झाला होता.
>२६ जानेवारीला देशाचे राष्ट्रपती देशाला संबोधित करतात हे मुलांना आवर्जून सांगा.
> राष्ट्रीय सण आणि सुट्ट्यांची माहिती द्या. त्यांना समजावून सांगा की या सुट्ट्या मौजमजेसाठी नसून देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या वीर सुपुत्रांचे स्मरण करण्यासाठी आहेत.
> प्रजासत्ताक दिनी सुट्टी असते किंवा शाळेत परेड आयोजित केली जाते आणि या दिवशी मिठाई वाटली जाते हे मुलांना सांगू नका. त्यांना या महत्त्वपूर्ण दिवसाचे खरे महत्त्व सांगा.
> जर मुलांना २६ जानेवारीच्या माहिती समजून घेण्यात रस नसेल, तर तुम्ही क्रिएटिव्ह खेळांच्या मदतीने त्यांना या दिवसाचे महत्त्व देखील समजावून सांगू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)