मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Lip Care: हिवाळ्यात ओठ फाटले आहेत? अशाप्रकारे घ्या ओठांची काळजी!

Lip Care: हिवाळ्यात ओठ फाटले आहेत? अशाप्रकारे घ्या ओठांची काळजी!

Jan 06, 2024 02:45 PM IST

Chapped Lips Home Remedies: हिवाळ्यात अनेकांना ओठ फाटण्याची समस्या उद्भवते. यासाठी ओठ मऊ कसे करायचे याबद्दल जाणून घेऊयात.

how to Take care of your Dry lip
how to Take care of your Dry lip (Freepik)

Winter Lip Care: हिवाळ्यात थंडी वाढत जाते तसं तशी त्वचा कोरडी पडू लागते. फक्त हात, पायाची नाही तर अगदी ओठही कोरडे होतात. हळू हळू ते ओठ फाटू लागतात. अगदी त्यातून रक्तही येऊ लागते. असे फाटलेले ओठ तुमचे सौंदर्य देखील खराब करतात. हिवाळ्यात कोरड्या वाऱ्यांमुळे ओलावा कमी होण्यास सुरुवात होते आणि ओठ खराबपणे क्रॅक होऊ लागतात. जर तुम्ही रोज ओठांना बाम लावला नाही तर तुमचे ओठ खराब होतात. अशा परिस्थितीत तुम्ही यावर काही घरगुती उपाय करू शकता. तुमच्या फाटलेल्या ओठांना कसं वाचवायचे याबद्दल जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

बदामाचे तेल

रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल ओठांवर लावणे फायदेशीर ठरेल. बदामाच्या तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन ई चे गुणधर्म ओठांवरचे कट बरे करण्यासाठी उपयुक्त ठरतील.

कॉफी

अनेक घरात रोज वापरली जाणारी कॉफीही ओठ ठीक करण्यासाठी वापरली जाऊ शकते. यासाठी १ चमचा कॉफीमध्ये खोबरेल तेलाचे काही थेंब मिसळा. या पेस्टने ओठ घासून स्वच्छ करा आणि थोडासा लिप बाम लावा.

शुगर स्क्रब

हा एक जुना आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे. यासाठी ओठांवर साचलेली मृत त्वचा काढून टाका. यासाठी अर्धा चमचा साखरेत खोबरेल तेल मिसळा. आता ते मिक्स करून बोटांच्या मदतीने ओठांवर चोळा. याने ओठ एक्सफोलिएट होतील आणि डेड स्किन निघून जाईल.

बीट ज्यूस

रोज ओठांवर बीटाचा रस लावल्याने ओठांचा रंग गुलाबी होईल आणि त्यात मध मिसळून लावल्यास ते लिप मास्कचे काम करेल. १५ मिनिटे ओठांवर ठेवा आणि नंतर धुवा. तुमचे ओठ मऊ आणि गुलाबी होतील.

लिंबाचा रस

जर ओठ फक्त कोरडे असतील आणि भेगा नसतील तर तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता. लिंबाच्या रसात थोडी साखर मिसळून ओठांवर चोळा. ५ मिनिटे ठेवल्यानंतर कोमट पाण्याने ओठ धुवा आणि लिप बाम लावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel
विभाग