Tips to Take Care of Toothbrush: ब्रश करणं हे प्रत्येकाच्या डेली रुटीनचं पहिलं काम असतं. पण टूथब्रशशी संबंधित किती गोष्टींची काळजी तुम्ही घेता? कदाचित एकही नाही. तुम्हाला माहित आहे का की दात आणि ओरल हेल्थसाठी आपले टूथब्रश देखील जबाबदार आहेत? त्यामुळे टूथब्रशची जास्त काळजी घेतली किंवा अजिबात काळजी घेतली नाही, तर या दोन्ही परिस्थिती ते हानिकारक आहेत. खरं तर टूथब्रश कव्हर करून ठेवला तर ओरल हेल्थला हानी पोहोचू शकते. जाणून घ्या टूथब्रशच्या काळजीशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी.
टूथब्रश वापरल्यानंतर प्रत्येक जण तो साफ करतो. पण वापरण्यापूर्वी ब्रश स्वच्छ करणं गरजेचं आहे. जेणेकरून त्यावर जमा झालेले बॅक्टेरिया स्वच्छ होतील.
टूथब्रशला कोणत्याही बॅक्टेरिया किंवा जंतूंपासून वाचवायचे असेल तर दुसऱ्या टूथब्रशपासून दूर ठेवा. तसेच, हे कोणत्याही प्रकारे पृष्ठभागावर चिकटू नये याची खात्री करा. अन्यथा त्यात बॅक्टेरिया वाढतील. टूथब्रश नेहमी उभ्या स्थितीत म्हणजे अपराइट पोझिशनमध्ये ठेवा.
अनेकांना टूथब्रश कव्हरने झाकून ठेवण्याची सवय असते. या सवयीमुळे टूथब्रशमध्ये बॅक्टेरिया निर्माण होऊ शकतात. टूथब्रश हवेच्या साहाय्याने कोरडे होऊ द्या. पण बाथरूममधील बॅक्टेरिया ब्रिस्टल्सला चिकटू नये म्हणून झाकून ठेवावे, असं अनेकांना वाटतं. परंतु आर्द्रता आणि अन्न कणांमुळे ब्रशमध्ये जंतू वाढू लागतात. त्यामुळे टूथब्रश कव्हर करून ठेवू नये.
टूथब्रश खराब होण्याची किंवा जुने होण्याची वाट पाहू नका. ब्रश जितका जुना असेल तितके जास्त बॅक्टेरिया असतील. त्यामुळे दर तीन ते चार महिन्यांनी टूथब्रश बदलून घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)