Pregnancy Tips: गरोदरपणात सांध्याच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? उपयुक्त आहेत तज्ज्ञांच्या या टिप्स-how to take care of joint health during pregnancy know useful tips by experts ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Pregnancy Tips: गरोदरपणात सांध्याच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? उपयुक्त आहेत तज्ज्ञांच्या या टिप्स

Pregnancy Tips: गरोदरपणात सांध्याच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? उपयुक्त आहेत तज्ज्ञांच्या या टिप्स

Aug 31, 2024 11:54 PM IST

Pregnancy Tips in Marathi: गरोदरपणात महिलांना विविध गोष्टींचा सामना करावा लागतो. या काळात आपल्या सांध्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या काही टिप्स उपयुक्त ठरतील.

pregnancy tips: गरोदरपणात सांध्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स
pregnancy tips: गरोदरपणात सांध्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips to Take Care of Joint Health During Pregnancy: गर्भधारणेदरम्यान ऑर्थोपेडिक समस्या दूर ठेवण्यासाठी गर्भवती महिलांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रेग्नेंसी दरम्यान स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडतात. केवळ मधुमेह, उच्च रक्तदाब, मळमळ किंवा उलट्याच नाही तर अनेक स्त्रियांना पाठदुखीचा त्रास होतो किंवा गर्भधारणे दरम्यान पायाला सूज येते. गर्भधारणेच्या या प्रवासात सांध्याच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते आणि स्त्रियांना भविष्यात सांधेदुखीसारख्या समस्येला सामोरे जावे लागते. मुंबई येथील अपोलो स्पेक्ट्राचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अलोक पांडे यांनी गरोदरपणात सांध्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स सांगितले आहेत.

कंबरदुखी - बाळाच्या जन्मादरम्यान शरीर मोठ्या प्रमाणात रिलॅक्सिन हार्मोन्स तयार करते, जे प्रसुतीसाठी तुमच्या पेल्विक क्षेत्रातील अस्थिबंधन मऊ होण्यास मदत करतात. परिणामी तुमच्या नितंबाच्या भागात वेदना आणि अस्वस्थता जाणवू शकते. या वेदना दैनंदिन कामात व्यत्यय आणतात. यासाठी योग्य ती काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

पाठीच्या खालच्या भागातील वेदना - तुम्हाला पाठीच्या खालच्या भागात दुखू शकते जे कधी कधी खुप त्रासदायक ठरु शकते. सततच्या वेदनांमुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि तुम्हाला चिडचिडही होईल.

पाय सुजणे - शरीराच्या ऊतींमध्ये द्रव तयार झाल्यामुळे पायांना सूज येऊ शकते. त्यामुळे महिलांसाठी चालतानाही अडचणींचा सामना करावा लागतो.

कार्पल टनल सिंड्रोम - हे बहुतेक वेळा तिसऱ्या तिमाहीत दिसून येते आणि त्यामुळे बोटे आणि हातामध्ये बधीरपणा, वेदना आणि मुंग्या येणे यासारखी लक्षणे दिसतात.

 

गरोदरपणात फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स

- गरोदर महिलांनी कमी हलका व्यायाम करावा. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तसेच फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा.

- चालणे हा एक उत्तम व्यायाम पर्याय ठरु शकतो.

- सलग काम करु नका थोड्या थोड्या अंतराने ब्रेक घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. बसून झोपणे टाळा.

- नितंबाच्या आणि पाठीवरच्या स्नायुंवरील दबाव कमी करण्यासाठी खाली वाकताना, बसताना, काम करताना, एखादी वस्तू उचलताना विशेष काळजी घ्या.

- हाडांच्या मजबूतीसाठी तज्ञांच्या सल्ल्यानुसार कॅल्शियम सप्लिमेंट घ्या.

- शिवाय तज्ञांच्या निरीक्षणाखाली वजन उचलण्याचे व्यायाम किंवा हलके स्ट्रेचिंग केल्याने हाडांची घनता वाढण्यास मदत होऊ शकते.

- शरीर हायड्रेटेड राखणे आणि पुरेसे पाणी पिणे हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करू शकते.

- गर्भवती महिलांनी त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)