Health Tips : रक्तवाहिन्यांसबंधीत विकार असल्यास कशी काळजी घ्याल? तज्ज्ञांचा सल्ला ऐकायलाच हवा!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips : रक्तवाहिन्यांसबंधीत विकार असल्यास कशी काळजी घ्याल? तज्ज्ञांचा सल्ला ऐकायलाच हवा!

Health Tips : रक्तवाहिन्यांसबंधीत विकार असल्यास कशी काळजी घ्याल? तज्ज्ञांचा सल्ला ऐकायलाच हवा!

HT Marathi Desk HT Marathi
Published Feb 19, 2025 11:13 AM IST

Blood Vessel Related Disorders : आर्टिरिओव्हेनस मॅफॉर्मेशन किंवा एव्हीएम हा रक्तवाहिन्यांचा एक विकार आहे, जो शरीरात कुठेही होऊ शकतो.

रक्तवाहिन्यांसबंधीत विकार असल्यास कशी काळजी घ्याल? तज्ज्ञांचा सल्ला ऐकायलाच हवा!
रक्तवाहिन्यांसबंधीत विकार असल्यास कशी काळजी घ्याल? तज्ज्ञांचा सल्ला ऐकायलाच हवा!

Health Tips In Marathi : आर्टिरिओव्हेनस मॅफॉर्मेशन किंवा एव्हीएम हा रक्तवाहिन्यांचा एक विकार आहे, जो शरीरात कुठेही होऊ शकतो. ही गंभीर स्थिती आहे जी तेव्हा उद्भवते जेव्हा रक्तवाहिन्या सामान्य रक्तप्रवाहात व्यत्यय आणत असामान्यरित्या जोडल्या जातात. कालांतराने यामुळे जास्त वेदना, सूज आणि अगदी रक्तस्त्राव यासारखे अनेक अस्वस्थ करणारे दुष्परिणाम होऊ शकतात. हे दुष्परिणाम शरीराच्या आत, त्वचेवर किंवा गुप्तांगांच्या आत खोलवर असलेल्या संवेदनशील भागात होऊ शकतात. जर वेळीच उपचार न केले तर ते संपूर्ण शरीरात खराब रक्त प्रवाह आणि ऊतींचे नुकसान अशा गंभीर गुंतागुंती निर्माण करतात शकते, असे प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गौरी जगदाळे सांगतात.

लक्षणे

एव्हीएम किंवा अँजिओकेराटोमीची अनेक लक्षणे एखाद्याला व्यक्तीमध्ये दिसून येऊ शकतात. यामध्ये वेदना होणे, सूज, संवेदनशीलता, त्वचेवर लाल किंवा जांभळ्या रंगाचे ठिपके, खाज सुटणे, जळजळ होणे, प्रभावित भाग सुन्न पडणे, प्रभावित भागात उबदारपणा जाणवणे, सहज जखम होणे, असामान्य रक्तस्त्राव, जखमा हळूहळू बरे होणे, स्पर्श करताच संवेदनशीलता वाढणे, लघवीवाटे रक्त येणे (जर ते जननेंद्रियातील AVM असेल तर) आणि त्वचेची जळजळ यासारखी लक्षणे असू शकतात. ही लक्षणे त्यांच्या स्थितीनुसार आणि तीव्रतेनुसार तसेच व्यक्तीनुसार बदलू शकतात. या लक्षणांची तीव्रता सौम्य ते गंभीर प्रकारची असू शकते. यामुळे होणाऱ्या वेदना एखाद्याच्या जीवनशैलीवर लक्षणीय परिणाम करू शकतात ज्यामुळे त्यांची दैनंदिन जीवनशैली पार पाडणे कठीण होऊ शकते. जर लक्षणे वाढू लागली तर पुढील निदानासाठी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांना भेटण्यास उशीर करू नका कारण त्यामुळे तुमची लक्षणे आणखी बिघडू शकतात.

प्रतिबंध करण्यासाठी टिप्स

* नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. वेळीच निदान झाल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते.

* कोणत्याही प्रकारच्या आघात किंवा दुखापतीपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी संवेदनशील भागांवर जास्त दबाव येईल अशा क्रिया करणे टाळा.

* त्वचेतील बदलांचे बारकाईने निरीक्षण करा आणि कोणत्याही प्रकारचे डाग आढळल्यास त्वरित निदानासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

* शरीरात चांगला रक्त प्रवाह राखण्यासाठी हायड्रेटेड आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा.

* सौम्य स्किनकेअर उत्पादने वापरा. ​​रासायनिक घटकांचा समावेश असलेल्या उत्पादनांचा वापर टाळा.

* जर तुम्हाला जखमा होऊन रक्तस्त्राव सुरू झाल्यास त्या भागाची स्वच्छता ठेवून त्यांची अत्यंत काळजी घ्या.

Whats_app_banner