मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Straightening: घरी केस स्ट्रेट कसे करावे? या स्टेप फॉलो केल्याने होणार नाही खराब

Hair Straightening: घरी केस स्ट्रेट कसे करावे? या स्टेप फॉलो केल्याने होणार नाही खराब

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 04, 2024 09:12 PM IST

Hair Treatment at Home: अनेक मुलींना स्ट्रेट केस आवडतात. पण हे घरी कसे करावे याबाबत कंफ्यूजन असते. या सोप्या स्टेप्स फॉलो करून घरी केस स्ट्रेट करता येतात.

केस स्ट्रेट करण्यासाठी स्टेप्स
केस स्ट्रेट करण्यासाठी स्टेप्स (unsplash)

Hair Straightening Steps: केस स्ट्रेट केल्यावर तुमचा लूक पूर्ण बदलतो. लग्न असो वा एखादा समारंभ, कार्यक्रम हेअरस्टाईल प्रमाणेच स्ट्रेट हेअर तुम्हाला सुंदर लूक देतो. पण प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जाऊन केस स्ट्रेट करुन घेणे परवडत नाही. यात वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी जातात. यासाठी बऱ्याच मुली घरीच हेअर स्ट्रेटनरच्या मदतीने केस स्ट्रेट करतात. पण हे करताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर केस खराब होण्याची भीती असते. तुम्हाला सुद्धा स्ट्रेटनर कसे वापरावे याबाबत कंफ्यूजन असेल किंवा भीती वाटत असेल तर तुम्ही या स्टेप फॉलो करू शकता. या स्टेप्सनी तुम्ही घरी सहज केस स्ट्रेट करू शकता.

केस धुणे महत्त्वाचे

केस स्ट्रेट करण्यापूर्वी केस नीट स्वच्छ करणे आवश्यक आहे. केस खराब आणि चिकट असतील तर ते नीट स्ट्रेट होणार नाही. त्यामुळे प्रथम केस शॅम्पूने धुवा आणि कोरडे करा. ओल्या केसांवर चुकूनही स्ट्रेटनर वापरू नका.

केस कोरडे झाल्यानंतरच स्ट्रेट करा

केस धुतल्यानंतर नीट कोरडे करा. त्यानंतर त्यातील गुंता नीट सोडवून घ्या. यासाठी तुम्ही रुंद दातांचा कंगवा किंवा हेअर ब्रश वापरू शकता. केस खूप जोराने विंचरू नका. यामुळे केस तुटण्याची भीती असते. केस नीट विंचरून त्याचा गुंता काढून घ्या.

हीट प्रोटेक्शन करा

स्ट्रेटनिंगमध्ये केसांना हीट होते, ज्यामुळे केसांना नुकसान होऊ शकतो. त्यामुळे आधी हीट प्रोटेक्शन सीरम किंवा स्प्रे वापरणे आवश्यक आहे. जर हीट प्रोटेक्शन वापरले नाही तर केस कोरडे आणि फ्रिजी होऊ शकतात. त्यामुळे हीट प्रोटेक्शन प्रोडक्ट वापरण्याची खात्री करा.

 

तापमान चेक करा

स्ट्रेटनर वापरण्यापूर्वी केसांना विभागून घ्या. वापरण्यापूर्वी एकदा स्ट्रेटरनचे तापमान चेक करा. जास्त उष्णतेमुळे केस खराब होतात आणि तुटतात. त्यामुळे तापमान चेक केल्याशिवाय ते वापरू नका.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग