मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Tips: वाटाणे साठवण्यासाठी फॉलो करा या सोप्या पद्धती, वर्षभर होणार नाही खराब

Kitchen Tips: वाटाणे साठवण्यासाठी फॉलो करा या सोप्या पद्धती, वर्षभर होणार नाही खराब

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 03, 2024 10:20 PM IST

Kitchen Tricks: हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळणारे हिरवे वाटाणे जास्त काळ पर्यंत साठवयाचे असतील तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

हिरवे वाटाणे साठवण्यासाठी टिप्स
हिरवे वाटाणे साठवण्यासाठी टिप्स (unsplash)

Ways To Store Green Peas: हिवाळ्यात विविध प्रकारच्या भाज्या, हिरवे वाटाणे, हरभरा, तूरीच्या शेंगा अशा अनेक गोष्टी मुबलक प्रमाणात मिळतात. या काळात बाजारात मिळणारे ताजे हिरवे वाटाणे खायला खूप टेस्टी लागतात. या मोसमात प्रत्येक घरात मटारच्या वेगवेगळ्या रेसिपी तयार केल्या जातात. प्रत्येकाला वाटाणे अनेक भाज्या, पोहे, उपमा, पुलावमध्ये घालून खायला आवडतात. चवीसोबतच मटार आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. वाटाणे पौष्टिक असतात. यामुळेच या ऋतूत लोक ते भरपूर खातात. जर तुम्हाला हे गोड वाटाणे वर्षभर साठवायचे असतील तर तुम्ही ही पद्धत अवलंबू शकता. या काही टिप्स फॉलो करुन तुम्ही वर्षभरसाठी वाटाणे साठवू शकता.

हिरवे वाटाणे साठवण्यासाठी पद्धत

- एका पातेल्यात ३ ते ४ लिटर पाणी उकळा.

- पाणी गरम झाल्यावर त्यात १ टेबलस्पून मीठ, २ चमचे साखर आणि १ चिमूट बेकिंग सोडा घाला.

- पाणी उकळायला लागल्यावर त्यात हिरवे वाटाणे घालून २ मिनिटे शिजवा.

- आता हे लगेच बर्फाच्या थंड पाण्यात टाका. लक्षात ठेवा की हिरवे वाटाणे शिजवण्याची गरज नाही.

- वाटाणे सुकवणे फार महत्वाचे आहे. यामुळे हे कळेल की तुमचे हिरवे वाटाणे एकत्र चिकटणार नाहीत आणि गोठल्यावर वेगळे राहतील.

सोडा का वापरायचा?

सोडा वापरल्याने रंग बराच काळ चमकदार राहील. हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. बेकिंग सोडा फक्त पाण्याला किंचित अल्कधर्मी पीएचमध्ये बदलतो आणि यामुळे हिरवा रंग वाढतो. ज्यामुळे तो अधिक स्थिर होतो. तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे वापरणे टाळू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel