मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Morning Sickness: गरोदरपणात होणाऱ्या मॉर्निंग सीकनेसपासून आराम देतात या गोष्टी

Morning Sickness: गरोदरपणात होणाऱ्या मॉर्निंग सीकनेसपासून आराम देतात या गोष्टी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 13, 2024 09:02 PM IST

Pregnancy Care Tips: गर्भधारणेच्या पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये अनेक स्त्रियांना मॉर्निंग सिकनेसची समस्या त्रास देते. ज्यामध्ये सकाळी उठल्याबरोबर उलट्या आणि चक्कर येते. यापासून आराम मिळवण्यासाठी या टिप्स उपयुक्त ठरू शकतात.

प्रेग्नेंसीमध्ये मॉर्निंग सिकनेसपासून आराम मिळवण्यासाठी उपाय
प्रेग्नेंसीमध्ये मॉर्निंग सिकनेसपासून आराम मिळवण्यासाठी उपाय (unsplash)

Home Remedies for Morning Sickness: बहुतेक महिलांना प्रेग्नेंसीच्या पहिल्या तीन महिन्यांत मॉर्निंग सिकनेसची समस्या सतावते. त्यामुळे उलट्या, चक्कर येणे, मळमळ यांसारखी लक्षणे दिसतात. खरं तर डॉक्टरही म्हणतात की ही समस्या ३ महिन्यांनंतर दूर होते. परंतु दिवसभरात कधीही उलट्या आणि मळमळ यासारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी महिला या पद्धती आणि पदार्थ ट्राय करू शकतात. यामुळे मॉर्निंग सिकनेसची समस्या तुम्हाला कमी त्रास देईल.

थोड्या प्रमाणात खाणे

प्रेग्नेंसी हार्मोन्समुळे कमी प्रमाणात अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेला त्रास होतो. त्यामुळे महिलांना सकाळी उठल्याबरोबर उलट्यांचा त्रास होऊ लागतो. अशा परिस्थितीत हे पदार्थ खा.

आले

मॉर्निंग सिकनेसची समस्या आल्याने कमी करता येते. आल्याचा चहा किंवा कँडी किंवा कुकीज घेतल्याने आराम मिळतो. परंतु या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण अनेक महिलांना आले खाण्यास मनाई असते. आले फार कमी प्रमाणात घेणे चांगले आहे.

आंबट गोष्टी

गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत उलट्या आणि मळमळ अनेक स्त्रियांना त्रास देतात. अशा परिस्थितीत आंबट पदार्थ काही प्रमाणात आराम देऊ शकतात. लिंबूपाणी किंवा लिंबाचा वास घेतल्याने उलट्यासारख्या समस्यांचे परिणाम कमी होतात. आंबट गोष्टींनी मॉर्निंग सिकनेस दूर होते.

पुदिना

पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये तुम्हाला सतत मळमळ होत असेल तर पुदिन्याची ताजी पाने चघळल्याने आराम मिळतो. ज्या महिलांना अन्नाच्या वासामुळे उलट्या होतात त्यांना पुदिन्याच्या पानांचा वास घेऊन किंवा खाल्ल्याने आराम मिळतो.

क्रॅकर्स किंवा नमकीन पदार्थ

सकाळच्या वेळी होणाऱ्या सिकनेसवर मात करण्यासाठी डॉक्टर अतिशय हलके नमकीन क्रॅकर्स खाण्याची शिफारस करतात. जेणेकरून शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भासत नाही आणि मीठ पोहोचत राहते.

जास्त अन्न खाऊ नका

पहिल्या तिमाहीत महिलांच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे पचनक्रिया कमजोर होते. अशा परिस्थितीत रोजचे आवश्यक पोषण मिळविण्यासाठी काही फळे, नट्स आणि चॉकलेट चिप्स यांसारख्या गोष्टी खाणे चांगले असते. जेणेकरून आपल्याला आवश्यक पोषण मिळेल आणि भूक लागणार नाही.

पाण्याच्या प्रमाणाबद्दल काळजी घ्या

जास्त उलट्यामुळे शरीरात पाणी आणि इलेक्ट्रोलाइटची कमतरता होते. अशा स्थितीत डिहायड्रेशन टाळण्यासाठी लिक्विडच्या प्रमाणावर लक्ष ठेवा. पाण्याशिवाय टरबूज, लिंबू पाणी यासारख्या गोष्टी प्या. स्पोर्ट्स ड्रिंक देखील एक चांगला पर्याय आहे.

 

व्हिटॅमिन बी ६ चे प्रमाण अधिक घ्या

मॉर्निंग सिकनेसची समस्या टाळण्यासाठी, व्हिटॅमिन बी ६ सप्लिमेंट्सचा अवश्य समावेश करा. व्हिटॅमिन बी ६ जास्त घेतल्याने बर्‍याच महिलांनी मॉर्निंग सिकनेसची समस्या कमी केली आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel