मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  मिटिंगमध्ये बोलणं कठीण जातंय; या टिप्स वापरून आत्मविश्वासानं मांडा तुमचं मत

मिटिंगमध्ये बोलणं कठीण जातंय; या टिप्स वापरून आत्मविश्वासानं मांडा तुमचं मत

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jun 23, 2022 10:04 AM IST

how to speak effectively in meetings : ऑफिसची मिटिंग असते तेव्हा अनेकांना दोन शब्दही बोलणं शक्य होत नाही. चांगलं आणि प्रभावी बोलता येणं ही एक कला आहे. त्यामुळं ही कला अवगत करण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्यात, जाणून घ्या!

how to speak effectively in meetings
how to speak effectively in meetings (instagram)

how to overcome fear of talking in office meetings : अनेक लोकांना ऑफिसच्या मिटिंगमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी चार-पाच लोकांमध्ये बोलायला लावलं तर त्यांना त्यांचं मत मांडणं शक्य होत नाही. व्यक्ती कितीही हुशार असला तरी त्याला त्याचं मत लोकांसमोर मांडता यायला हवं कारण सध्याच्या काळात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर तुमचं प्रेझेन्टेशन आणि तुमचं संवादकौशल्य उत्तम असणं फार गरजेचं बनलं आहे. त्यामुळं ऑफिसच्या मिटिंगमध्ये प्रभावीपणे बोलण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्यात, याबद्दल जाणून घेऊयात.

स्वत:वर विश्वास ठेवा...

ऑफिस मिटिंगमध्ये बोलण्यासाठी सर्वात आधी तुमचा स्वत:चा स्वत:चा विश्वास असणं गरजेचं असतं. कारण 'मला हे जमू शकतं', असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तुमचं मत मांडायला सोपं जाईल.

प्रेझेन्टेशन्सची पूर्वतयारी करा...

तुम्हाला ऑफिसमध्ये कधी आणि कोणत्या विषयावर बोलायचं आहे, त्याची पूर्वतयारी व्यक्तीनं करायला हवी, कारण त्यामुळं तुमच्या मनात आत्मविश्वास तयार होतो. याशिवाय तुम्ही जेव्हा बोलायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही कधीही अडखळत नाही.

भाषेवर पकड मिळवा...

तुम्हाला ज्या भाषेत ऑफिसमध्ये प्रेझेन्टेशन द्यायचं आहे त्या भाषेवर तुमची पकड असायला हवी. तुमच्याकडे शब्दसाठा भरपूर असेल तर बोलताना तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही आणि मिटिंगमध्ये तुमचा आत्मविश्वासही वाढण्यास मदत होते.

महत्त्वाचे मुद्दे मांडा...

जेव्हा कधी तुमच्या ऑफिसमध्ये मिटिंग असेल तेव्हा त्यात बोलताना तुमचे मुद्दे चांगल्या क्वालिटीचे, तर्क असलेले आणि हाईटचे असायला हवे, जर हे तुम्हाला करणं शक्य असेल तर ऑफिस मॅनेजमेन्ट तुमच्यावर प्रभावित होण्याची शक्यता असते.

अनावश्यक भीती अथवा शंका नको...

ऑफिसमध्ये बोलताना माझं काही चुकलं तर काय होईल किंवा लोक काय म्हणतील, असले विचार कधीही करू नका. कारण त्यामुळं तुम्ही नेहमी डिस्करेज होत असता. नेहमी सकारात्मक विचार करायला हवा. आयुष्य हे दररोज काही तरी नवीन शिकण्यासाठीच असतं. संभाषणकौशल्याच्या बाबतीत रोज काही तरी पाहणं, वाचणं आणि त्याला आपल्या शब्दांत मांडणं हा सर्वोत्तम सराव आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग