प्रत्येक महिला आणि मुलीला साडी आवडते. अगदी प्रत्येक सणाला, कार्यक्रमाला महिला साडी घेतात. पण तरीही महिलांकडे भरपूर साड्या असल्या तरी अधिक साड्या खरेदी करण्याची त्यांची इच्छा कधीच कमी होत नाही. प्रत्येक वेळी ट्रेंडी साड्या बाजारात येतात आणि त्या खरेदी करण्यासाठी महिला हजारो रुपये खर्च करतात. पण काही काळानंतर या साड्या केवळ वॉर्डरोबमध्ये पडून राहतात. असेच पडून राहून या साड्यांचा ढीग वाढत जातो. मग अनेक वेळा महिलांना प्रश्न पडतो की अशा सुंदर साड्यांचं काय करायचं? चला तर मग जाणून घेऊयात की या साड्यांचं काय करायचं. या जुन्या साड्यांनी तुम्ही तुमचे घर सजवू शकता. या साड्या तुमच्या घराचा लूक बदलतील. या जुन्या साड्या तुमच्या घरासाठी कशा वापरायच्या ते जाणून घेऊयात.
कुशन कव्हर्स बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या जुन्या साड्यांचाही वापर करू शकता. जर तुमचा सोफा पेस्टल रंगाचा असेल तर त्यावर अनेक रंगेबेरंगी कुशन खूप सुंदर दिसतील. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जुन्या साड्यांचे कुशन कव्हर बनवून तुमच्या सोफ्याला नवा लुक देऊ शकता.
जेव्हा कोणी घरात येते तेव्हा त्याला पहिल्यांदा दिसत ते डोअरमॅट. त्यामुळे हे डोअरमॅट छान असलायचं हवं. जुन्या साड्यांपासून तुम्ही तुमच्या घराच्या दरवाज्यात ठेवण्यासाठी सुंदर डोअरमॅट बनवू शकता. त्याचे बहुरंगी रंग घराच्या लुकमध्ये भर घालतील.
बजेटमध्ये घर सजवण्यासाठी जुन्या साड्यांपासून पडदे बनवणे ही एक चांगली कल्पना आहे. जुन्या नेट साड्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या घराच्या दारासाठी पडदे तयार करू शकता. साडीची लांबी एवढी असते की घराच्या एका दाराचे पडदे सहज झाकता येतात.
जर तुम्ही तुमचे घर झाडांनी सजवले असेल तर त्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही प्लांटर कव्हर देखील वापरू शकता. तुम्ही तुमच्या जुन्या साड्या प्लांटर कव्हर म्हणून वापरू शकता. आजकाल, प्लांटर कव्हर्स देखील ट्रेंडमध्ये आहेत.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या