Reuse of Leftover Diwali Sweets: दिवाळीनिमित्त घरी विविध प्रकारचे गोडधोड बनवले जाते. शिवाय बाजारातून सुद्धा मिठाई आणली जाते. सोबतच अनेक लोक एकमेकांना मिठाई गिफ्ट म्हणून देतात. अशा परिस्थितीत या सर्व मिठाई संपवणे ही सर्वात मोठी समस्या असते. सण संपल्यानंतरही तुमच्या फ्रीजमध्ये मिठाई शिल्लक राहिली असेल आणि कोणीही ते खायला तयार होत नसेल तर ते संपवण्याचे टेन्शन घेऊ नका. तर तुम्ही या टेस्टी मार्गांनी या मिठाईचा पुन्हा वापर करू शकात. उरलेल्या मिठाईंचा पुनर्वापर कसा करायचा ते जाणून घ्या
बरेच लोक दिवाळीला सोनपापडी गिफ्ट म्हणून देतात. तुमच्या घरी सुद्धा भेट म्हणून सोनपापडी जमा झाली असेल तर त्यांचा पुन्हा वापर करण्याचा एक टेस्टी मार्ग म्हणजे पुरणपोळी. सोनपापडी दुधात मिसळून पेस्ट बनवा आणि त्यापासून पुरणपोळी तयार करा.
दुधात खव्याची मिठाई मिसळून चवदार मिठाई शेक तयार करता येतो. लहान मुलांना आणि मोठ्यांनाही त्याची चव आवडेल.
जर तुमच्या घरी उरलेले बुंदीचे लाडू असतील तर ते स्मार्टली खीरमध्ये रूपांतरित केले जाऊ शकतात. फक्त दूध घट्ट करा, त्यात बुंदीचे लाडू घाला आणि शिजवा. चविष्ट बुंदी खीर तयार होईल.
उरलेली कोणतीही मिठाई क्रश करा. आता बटाट्याच्या पराठ्यांसारखे ही मिठाई भरुन पराठा बनवा आणि भाजा. हे चविष्ट पराठे मुलं मोठ्या उत्साहाने खातील. त्यामुळे या दिवाळीत तुमच्या फ्रीजमध्ये भरपूर मिठाई शिल्लक राहिल्यास त्यांचा या मार्गांनी स्मार्टपणे वापर करता येईल.