How to remove stain from white shirt: अनेकांची सकाळ चहा आणि कॉफीने होते. काहींची तर संध्याकाळ पण याच पेयांनी होते. अनेकदा हे पेय चुकून पडते किंवा सांडते आणि जर हे पदार्थ नेमके पांढऱ्या कपड्यांवर पडले तर त्याचे दार सर्वात जास्त दिसतात. यामुळे तर लोक या रंगाचे कपडे घालण्यापूर्वी किंवा खरेदी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करतात. या कपड्यांवरचे डाग सगळ्यात हट्टी असतात. हे असलं तरी पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे हे प्रत्येकाला आवडतं. पण ते घातल्यानंतर त्यावर कोणताही डाग पडणार नाही याचीही तितकीच काळजी घ्यावी लागते. तरीही, कधीकधी डाग पडतातच. बऱ्याच वेळा कॉफी किंवा चहा पांढऱ्या कपड्यांवर पडतो. अशा परिस्थितीत काय करावं समजत नाही. यामुळेच आम्ही तुमच्यासाठी खास टिप्स घेऊन आलो आहोत जे तुमची समस्या बऱ्याच प्रमाणात सोडवू शकतो.
> जर डाग ताजे पडले असतील तर पहिली गोष्ट म्हणजे लगेच कपडे काढून पाण्यात भिजवा.
> आता त्यावर अर्ध्या लिंबाचा रस घाला आणि एक चमचा टॅल्कम पावडर घाला.
> यानंतर, दात स्वच्छ करण्यासाठी ब्रशने घासून घ्या.
> डाग सहज निघताना दिसतील. चहा किंवा कॉफीचे डाग फक्त १० मिनिटांत साफ होतील.
> सर्वप्रथम एका भांड्यात बेकिंग सोडा घ्या. त्यात लिंबाचा रस टाकून द्रावण तयार करा.
> यानंतर, ब्रशच्या मदतीने, डागांवर हळूहळू लावा आणि स्क्रब करा.
> बेकिंग सोडा मिश्रण लावल्यानंतर, १० मिनिटे सोडा.
> यानंतर कोणत्याही वॉशिंग पावडरच्या मदतीने ते घासून घ्या. डाग हलका होऊ लागेल.
> ही प्रक्रिया २ ते ३ वेळा केल्यास डाग पूर्णपणे नाहीसे होतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)