Stain Removing Tips : कपड्यांवर लागले पान-गुटख्याचे डाग? टेन्शन नका घेऊ! 'या' ट्रिक्सनी सहज होतील साफ!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Stain Removing Tips : कपड्यांवर लागले पान-गुटख्याचे डाग? टेन्शन नका घेऊ! 'या' ट्रिक्सनी सहज होतील साफ!

Stain Removing Tips : कपड्यांवर लागले पान-गुटख्याचे डाग? टेन्शन नका घेऊ! 'या' ट्रिक्सनी सहज होतील साफ!

Dec 09, 2024 10:26 AM IST

How To Remove Pan Masala Stains : तुम्हालाही कपड्यांवर लागलेले पान-गुटख्याचे डाग सहज काढायचे असतील, तर तुम्ही या टिप्सचा वापर करून हे जिद्दी डाग दूर करू शकता.

Stain Removing Tips
Stain Removing Tips

How To Remove Pan Masala Stains From Cloths : कपड्यांवरील काही डाग एक किंवा दोन वेळा घासून सहज काढता येतात. पण, काही डाग असे असतात जे कपड्यांवरून निघण्याचे नाव घेत नाहीत. या डागांपैकी एक डाग पान-गुटख्याचा डाग आहे. साधारणपणे कपड्यांवरील हळद, ग्रीस, शाई, तेल इत्यादी डाग सहज निघून जातात. पण, पान आणि गुटख्याचे डाग निघता निघत नाहीत. अनेक वेळा पतीच्या कपड्यांवर पान, गुटखा आदी डाग पडल्याने महिला चिंताग्रस्त होतात. हे डाग सहज निघाले नाहीत, तर हे कपडे फेकून दिले जातात.

अनेक स्त्रिया आपल्या पतीला 'शर्ट किंवा पॅन्टवरील पान-गुटख्याचे डाग काढणे अवघड आहे, हे माहीत असताना तुम्ही ते का खाता?', असे समजावण्याचा प्रयत्नही करतात. बरं, जर तुम्हालाही तुमच्या पतीच्या शर्ट-पॅन्ट किंवा तुमच्या स्वतःच्या ड्रेसवरून पान-गुटख्याचे डाग सहज काढायचे असतील, तर आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत. कपड्यांवरील पान-गुटख्याचे डाग काढून टाकण्यासाठी काही सोप्या हॅकबद्दल जाणून घेऊया…

लिंबू वापरा

कोणताही डाग काढून टाकण्यासाठी सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे लिंबाचा रस. लिंबाचा वापर करून, कपड्यांवरील कोणताही डाग सहजपणे काढला जाऊ शकतो. कपड्यांवरील पान-गुटख्याचे डाग काढण्यासाठी देखील लिंबाचा रस वापरू शकता. यासाठी एका लिंबाचे दोन भाग करा. आता हे लिंबू डाग लागलेल्या भागावर काही वेळ चोळा. एक-दोनदा चोळल्याने पान आणि गुटख्याचे डाग सहज निघून जातात.

हायड्रोजन पेरोक्साइडचा वापर करा

कपड्यांवरील पान, गुटखा इत्यादींचे डाग घालवण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइड हा उत्तम उपाय आहे. त्याच्या मदतीने पान-गुटख्याचे अगदी जिद्दी डागही सहज काढता येतात. त्याचा वापर केल्याने कपड्यांवरील डाग निघून जातात आणि कपड्यांचा रंगही जात नाही. यासाठी एका भांड्यात हायड्रोजन पेरॉक्साइड आणि एक ते दोन चमचे लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा. यानंतर, कपड्यावर डाग असलेली जागा या मिश्रणात बुडवा आणि काही काळ राहू द्या. ८-१० मिनिटांनी डाग स्वच्छ करा. यामुळे डाग सहज निघून जातील.

Black Pepper Benefits: चिमूटभर काळी मिरी मिसळून एक चमचा तूप खाल्ल्याने 'या' गंभीर समस्या होतील दूर!

रबिंग अल्कोहोल वापरा

डाग काढून टाकण्यासाठी रबिंग अल्कोहोल वापरणे हा देखील एक उत्तम घरगुती उपाय आहे. हे हायड्रोजन पेरोक्साइड प्रमाणेच काम करते. पण, यात लिंबाऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. कोमट पाण्यात एक ते दोन चमचे रबिंग अल्कोहोल मिसळून मिश्रण तयार करा. यानंतर, कपड्याचा डाग असलेला भाग या मिश्रणात बुडवा आणि काही वेळ राहू द्या. काही वेळानंतर, ब्रशच्या मदतीने ते डाग स्वच्छ करा.

कॉर्न स्टार्च वापरा

कॉर्नस्टार्च वापरुन, तुम्ही कपड्यांवरील कोणतेही डाग सहज काढू शकता. पान आणि गुटख्याचे डाग काढून टाकण्यासाठी प्रथम कॉर्नस्टार्च आणि डिटर्जंट पावडर मिसळून द्रावण तयार करा. यानंतर कपड्याची डाग असलेली जागा या द्रावणात टाका आणि हलक्या हाताने घासून स्वच्छ करा. साफ केल्यानंतर, ती पाण्याने धुवा. डाग अजूनही दिसत असल्यास, आपण ही प्रक्रिया आणखी एक किंवा दोन वेळा पुन्हा करू शकता. यामुळे डाग सहज निघून जातात.

Whats_app_banner