Home Remedies: सुंदर दिसण्यासाठी महिला आवर्जून वेगवगेळ्या पद्धतींचा अवलंब करतात. कधी घरगुती उपाय केले जातात तर कधी पार्लरची मदत घेतली जाते. ब्लिचिंग करणे हे फार कॉमन आहे. चेहऱ्यावरील घाण काढण्यासाठी महिला ब्लीचिंगची मदत घेतेतात. यामुळे चेहरा उजळतो यात शंका नाही, पण काही लोकांना यानंतर स्किनवर जळजळ होण्याची समस्या भेडसावते. ब्लीच काही लोकांना सूट होत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही ही समस्या असेल, तर आम्ही तुम्हाला ब्लीचिंगनंतर जळजळ आणि वेदनापासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत.
चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावा. चेहरा आणि मानेच्या भागांवरही हा गर लावा. कोरफड मधील दाहक-विरोधी गुणधर्म चेहऱ्याची जळजळ आणि लालसरपणा कमी करतात. यामुळे वेदना आणि जळजळ यापासून आराम मिळतो.
फेस ब्लिचिंग केल्यानंतर चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे लावा. हा एक अतिशय प्रभावी घरगुती उपाय आहे. असे केल्याने जळजळ कमी होते. जोपर्यंत तुम्हाला जळजळ होण्यापासून आराम मिळत नाही तोपर्यंत बर्फ लावत राहा.
दूध हा एक जुन्या पद्धतीचा उपाय आहे, जो चेहरा ब्लीच केल्यानंतर वापरला जातो. कच्चे दूध चेहऱ्यावर लावा आणि ब्लीचिंग केल्यानंतर थंड पाण्याने धुवा. कापूस दुधात बुडवून जळलेल्या जागेवर लावा, आराम मिळेल.
ब्लीच केल्यानंतर होणारी जळजळ दूर करण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता. अशा स्थितीत तुम्ही दह्यात हळद घालून लावू शकता. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)