भारतीय घरांमध्ये तूप हा असा खाद्यपदार्थ आहे जो जेवणात आणि पूजेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. घरी जेंव्हा जेवण बनवलं जातं तेंव्हा अनेकजण डाळीत तूप आवर्जून टाकतात. घरात पाहुणे आले तरी त्याच्या चपातीला तूप नक्कीच लावले जाते. त्याचा वापर जास्त असल्याने आणि होणाऱ्या आरोग्यदायी फायदे असल्यामुळे बनावट तूपही बाजारात विकायला सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या काळात बनावट मिठाई, सुका मेवा, तूप यांचा काळाबाजार झपाट्याने वाढतो. अशा परिस्थितीत या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही खरे आणि नकली तूप ओळखू शकाल.
'असं' तपासा
बाजारातून तूप आणताना ते हाताला घेऊन पहा. जर ते वितळले तर ते खरे आहे. परंतु तसे झाले नाही तर लगेच दुकानदाराला परत करा. दोन चमचे तुपात आयोडीन टाका आणि त्याचा रंग जांभळा झाला तर बघा, म्हणजे तूप बनावट आहे.
तूप गरम केल्यावर ते लगेच वितळले आणि तपकिरी झाले तर समजावे की ते खरे आहे. तर तुपात साखर मिसळून ती नीट ढवळत राहिल्यास त्याचा रंग लाल झाला तर त्यात तेलाची भेसळ झाली आहे हे समजावे.
देसी तूप बनवण्यासाठी ४० टक्के रिफाइंड तेल आणि ६० टक्के फार्चून वनस्पती मिसळली जाते. ते बनवल्यानंतर त्यात देशी तूपही मिसळले जाते.
संबंधित बातम्या