खरं तर आपले मित्र आणि नातेवाईकांशी साध्या, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने संवाद साधता यावा या उद्देशाने व्हॉटसॲप तयार करण्यात आले आहे. मॅसेजिंग हे मुलभूतरीत्या खाजगी असते. व्हॉटसॲपचे यूजर्स सुरक्षित राहतील अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे. व्हॉटसॲपचा जबाबदारीने वापर करण्यासाठी यूजर्ससाठी खालील मार्गदर्शकतत्त्वांचे पालन केले पाहिजे.
एखाद्या व्यक्तीने स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधला असेल किंवा तुम्ही व्हॉटसॲपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधावा अशी विनंती त्याने स्वतःहून केली असेल, अशाच व्यक्तींना मॅसेज पाठवावा. लोकांनी सर्वप्रथम तुम्हाला स्वतःहून मॅसेज करावा यासाठी तुम्ही त्यांना तुमचा फोन नंबर देणे उत्तम ठरेल.
तुमच्या संपर्कातील कॉन्टॅक्ट्सना व्हॉटसॲप ग्रुपमध्ये जोडण्यापूर्वी तुम्ही त्यांची परवानगी घेणे आवश्यक असते. एखाद्याला ग्रुपमध्ये जोडले आणि तो व्यक्ती स्वतःहून ग्रुपमधून बाहेर पडला, तर त्याच्या निर्णयाचा आदर करा.
व्हॉटसॲपने ग्रुप्ससाठी फक्त ॲडमिनकरिता असणारे मॅसेज सेटिंग तयार केले आहे. तुम्ही ॲडमिन असाल, तर सर्व सहभागी सदस्य ग्रुपवर मॅसेजेस पाठवू शकतात की केवळ ग्रुप ॲडमिन ग्रुपवर मेसेजस पाठवू शकतो, हे तुम्ही ठरवू शकता. हे फीचर वापरल्याने ग्रुप्समध्ये येणारे नकोसे मेसेजेस बंद होण्यास मदत होते. ग्रुपची ॲडमिन सेटिंग्ज कशी बदलावीत याची माहिती करून घ्या.
व्हॉटसॲपने सर्व फॉरवर्ड केलेल्या मेसेजेसकरिता लेबल तयार केले आहे. यूजर्सनी मॅसेजेस शेअर करण्यापूर्वी पुन्हा खात्री करून घ्यावी. व्हॉटसॲपने एक मॅसेज किती वेळा फॉरवर्ड करावा यावर मर्यादा आणली आहे. एखादी गोष्ट खरी असल्याची तुम्हाला खात्री नसेल किंवा मॅसेज कुणी लिहिला हे तुम्हाला माहीत नसेल, तर असा मेसेज फॉरवर्ड करू नये.
नकोसे मेसेजेस: एखाद्या व्यक्तिने तुम्ही त्यांना मेसेज पाठवू नये असे सांगितले असेल, तर तुम्ही त्यांना तुमच्या ॲड्रेस बुकमधून काढून टाकावे आणि त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये.
ऑटोमेटेड किंवा बल्क मेसेजेस: व्हॉटसॲप वापरून बल्क मेसेज, ऑटो-मेसेज किंवा ऑटो-डायल करू नका. मशीन लर्निंग टेक्नॉलॉजी आणि यूजर्सकडून येणारे रिपोर्ट्स या दोन्हींचा वापर करून व्हॉटसॲप हे नकोसे मॅसेजेस पाठवणारे खाते बॅन करू शकते. अनधिकृत किंवा ऑटोमेटेड खाती किंवा ग्रुप्स तयार करू नका अथवा व्हॉटसॲपच्या अनधिकृत आवृत्त्या वापरू नका.
दुसऱ्याची कॉन्टॅक्ट लिस्ट वापरू नका: परवानगीशिवाय कोणाचाही फोन नंबर शेअर करू नका किंवा बेकायदेशीर स्रोतांमधून येणार डेटा वापरून व्हॉटसॲप यूजर्सना मॅसेज पाठवणे किंवा त्यांना ग्रुप्समध्ये सामील करणे बेकायदेशीर असते.
ब्रॉडकास्ट लिस्टचा अतिवापर टाळा: यूजर्सनी तुमचा फोन नंबर त्यांच्या ॲड्रेस बुकमध्ये समाविष्ट केलेला असेल तरच त्यांना तुम्ही ब्रॉडकास्ट लिस्ट वापरून पाठवलेले मॅसेजेस प्राप्त होतात. ब्रॉडकास्ट मॅसेजेसचा वारंवार वापर केल्यास लोक तुमच्या मॅसेजेसची तक्रार करू शकतात, हे कृपया लक्षात असू द्या. ज्या खात्यांची अनेकदा तक्रार केली जाते ती खाती व्हॉटसॲपद्वारे बॅन केले जाते.
संबंधित बातम्या