Fashion Tips: लेदर जॅकेट, बूट आणि पर्स खराब होण्यापासून कसे वाचवायचे? जाणून घ्या-how to protect leather jackets boots and purses from getting damaged ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fashion Tips: लेदर जॅकेट, बूट आणि पर्स खराब होण्यापासून कसे वाचवायचे? जाणून घ्या

Fashion Tips: लेदर जॅकेट, बूट आणि पर्स खराब होण्यापासून कसे वाचवायचे? जाणून घ्या

Feb 26, 2024 03:20 PM IST

Leather Items Protection: जास्त काळ लेदरच्या वस्तू ठेवल्यास लेदर खराब होऊ लागते. लेदरच्या वस्तूंची योग्य काळजी कशी घ्यावी आणि या वस्तू कशा स्टोअर करायच्या यांबद्दल जाणून घ्या.

How to protect leather Items from getting damaged
How to protect leather Items from getting damaged (freepik)

How to take care of Leather Items:  लेदर अर्थात चामड्याच्या वस्तू जितक्या अधिक स्मार्ट आणि अट्रॅक्टीव्ह दिसतात तितकी त्यांची काळजी घेणे अधिक कठीण असते. लेदरच्या वस्तूंना जपावे लागते. नीट काळजी न घेतल्यास ते खराब होऊ लागतात. लेदरच्या वस्तू महागही असतात. अनेक वेळा आपण महागडे लेदरचे जॅकेट, पर्स किंवा बूट कमी वापरतो. पण लेदरच्या वस्तू जास्त वेळेसाठी ठेवल्याने ते लवकर खराब होऊ लागतात. याच कारणांमुळे लेदरच्या वस्तूंची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पिशव्यांपासून ते शूज आणि जॅकेटपर्यंत, चामड्याच्या वस्तू अतिशय काळजीपूर्वक ठेवाव्या लागतात. जर तुम्ही तुमचे हिवाळ्यातील बूट आणि लेदर जॅकेट पॅक करून स्टोअर करण्याच्या तयारीत असाल तर जाणून घ्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ते जाणून घ्या.

लेदर जॅकेट कसे स्टोअर करायचे?

जर तुम्ही हिवाळ्यातील लेदर जॅकेट स्टोअर करून ठेवणार असाल तर ते व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. लेदर जॅकेट दुमडून ठेवू नका. त्याऐवजी हँगरवर जॅकेट लटकवा. लेदर जॅकेट कधीही प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये गुंडाळून ठेवू नका. यामुळे लेदरचे नुकसान होऊ शकते. कडक सूर्यप्रकाशात लेदरच्या वस्तू ठेवू नकात. याशिवाय ओलसर असतानाही लेदर जॅकेट स्टोअर करून ठेवू नकात. हिवाळ्याव्यतिरिक्त, वेळोवेळी लेदर जॅकेट काढत रहा आणि त्यांला हवा द्या.

लेदर शूज कसे स्टोअर करायचे?

लेदरचे शूज आणि बूट अनेक वेळा घातल्यानंतर अनेक ठिकाणी वाकतात किंवा त्याला स्क्रॅचेस येऊ लागतात. अशा परिस्थितीत, लेदर शूज पॉलिश करण्यापूर्वी त्यावर रात्रभर क्रीम लावा. जर शूज ओले झाले असतील तर ते टिश्यू पेपर किंवा पेपरने झाकून ठेवा. घराच्या आत पंख्याच्या हवेने वाळवा. लक्षात ठेवा उन्हात सुकवू नका कारण लेदर उन्हात खराब होते.

लेदर बॅग कशी स्टोअर करायची?

लेदर बॅग ही फॅशन प्रेमींकडे असतेच असते. कारण लेदर कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही. जर लेदरची तुम्ही बॅग घाण झाली असेल तर त्या कापडाने स्वच्छ करा. तुम्ही लेदर कंडिशनर देखील वापरू शकता. लेदरच्या पिशवीवर डाग असल्यास त्यावर वॉशिंग पावडर शिंपडा आणि नंतर स्वच्छ करा. पेन किंवा शाईचे डाग असतील तर ते पांढऱ्या खोडरबरने घासून स्वच्छ करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग