Tips to Protect Eye from Cold Wave: हिवाळ्यात थंड वाऱ्याचा शरीरावर परिणाम होतो. या काळात आहार आणि शरीराची विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. शरीराला केवळ बाहेरूनच नव्हे तर आतूनही मजबूत करणे आवश्यक आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते आणि शरीर उबदार राहते आणि त्यामुळे थंडी जाणवत नाही. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांची काळजी घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. अनेकदा घराबाहेर पडताना आपण आपल्या शरीराचे चांगले संरक्षण करतो. पण डोळ्यांकडे लक्ष देत नागी. त्यामुळे अनेकदा डोळ्यांना थंडी जाणवते आणि काही समस्यांना सामोरे जावे लागते. चला तर मग जाणून घेऊया थंड वाऱ्यामुळे झाल्यावर डोळ्यांमध्ये कोणकोणत्या समस्या येतात आणि त्यापासून बचाव कसा करावा.
थंडीमुळे हवेत ओलावा नसतो. तर घरातील खोली उबदार राहण्यासाठी लोक हीटर आणि ब्लोअर चालू ठेवतात. अशा स्थितीत त्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो आणि डोळ्यातील नैसर्गिक अश्रू गायब होऊ लागतात. अशा परिस्थितीत ही लक्षणे दिसतात.
- डोळ्यात कोरडेपणा जाणवतो.
- डोळ्यांना खाज येते आणि जळजळ जाणवते.
- यासोबतच डोळ्यात लालसरपणा येतो आणि काही वेळा वेदनाही जाणवतात.
- कमी तापमानामुळे विषाणूंचा प्रसार झपाट्याने होतो आणि काही वेळा थंडीमुळे डोळ्यांत कंजेटिव्हायटिस होण्याची भीती असते.
- जर तुम्ही जास्त वेळ थंडीत बाहेर असाल आणि थंड वारे सतत तुमच्या डोळ्यांना आदळत असतील तर त्यामुळे कॉर्नियालाही इजा होऊ शकते.
- तसेच प्रकाशामुळे डोळ्यांमध्ये संवेदनशीलता येते.
- अंधुक दिसायला लागते आणि वेदना होतात. अशा परिस्थितीत डोळ्यांचे थंडीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे.
- घरातून बाहेर पडताच नेहमी सनग्लासेस लावा. हे चष्मे केवळ सूर्यप्रकाशापासूनच संरक्षण करत नाहीत तर थंड वाऱ्याला थेट डोळ्यांवर आदळण्यापासूनही संरक्षण करतात.
- डोळ्यांमध्ये लूब्रिकेटिव्ह आय ड्रॉप्स टाका. ज्यामुळे डोळ्यांतील कोरडेपणाची समस्या दूर होईल.
- घर आणि कार्यालयातील हीटर आणि उष्णता पसरवणाऱ्या वस्तूंमुळे कोरडेपणा येतो. अशा स्थितीत डोळ्यांना मॉइश्चर देणे गरजेचे आहे.
- वारंवार डोळे मिचकावत राहा. त्यामुळे डोळ्यांमध्ये ओलावा टिकून राहील.
- तहान लागत नसली तरी पुरेसे पाणी प्यावे. यामुळे डोळ्यातील आर्द्रताही कायम राहते.
- व्हिटॅमिन ए, सी आणि ई असलेले पदार्थ खा. गाजर, आवळा, मटार, बीन्स, बीटरूट, फ्लॉवर, हे सर्व पदार्थ डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत.
- तुमच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करा ज्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स असतात.
- तुम्ही आर्टीफिशियल टियर देखील वापरू शकता. यामुळे डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या दूर होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या