Cleaning Tips: थर्मस फ्लास्क बंद करून ठेवल्याने खराब वास येतोय? साफ करण्यासाठी उपयोगी पडतील या टिप्स-how to prevent bad smell from thermos flask bottle follow these smart cleaning tips ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cleaning Tips: थर्मस फ्लास्क बंद करून ठेवल्याने खराब वास येतोय? साफ करण्यासाठी उपयोगी पडतील या टिप्स

Cleaning Tips: थर्मस फ्लास्क बंद करून ठेवल्याने खराब वास येतोय? साफ करण्यासाठी उपयोगी पडतील या टिप्स

Feb 01, 2024 11:52 PM IST

Smart Storage Tips: थर्मल फ्लास्क किंवा गरम-थंड पाण्याची बाटली अनेक महिने बंद करून ठेवल्यास त्यातून वास येऊ लागतो. अशा वेळी या स्मार्ट स्टोअरेज टिप्स उपयुक्त ठरतील.

थर्मल फ्लास्क स्टोअर करण्यासाठी टिप्स
थर्मल फ्लास्क स्टोअर करण्यासाठी टिप्स

Tips to Prevent Bad Smell From Thermos Flask Bottle: आजकाल थर्मल फ्लास्क किंवा थंड गरम बॉटल नियमित वापरणे खूप सामान्य आहेत. जवळजवळ प्रत्येकाकडे असते. प्रवासात गरम पाणी ठेवायचं की गरम चहा, त्याचा उपयोग प्रत्येक कामात होतो. पण जेव्हाही गरम पाण्याची बाटली धुऊन ठेवली जाते तेव्हा तिचा वास येऊ लागतो. थर्मल बाटलीतून येणारा वास काढणे तुम्हाला अवघड वाटत असेल तर या स्मार्ट टिप्स वापरून ठेवा. पुढच्या वेळी तुम्ही झाकण उघडाल तेव्हा वास येणार नाही. जाणून घ्या या टिप्स

टिश्यू पेपरसोबत स्टोअर करा

थर्मल फ्लास्क बराच काळ वापरायचा नसेल तर तो नीट धुवा आणि कोरडी करा. नंतर त्यात टिश्यू पेपर गुंडाळून गोळे बनवून बाटलीच्या आत ठेवा. झाकण बंद करा. तुम्ही हे काही महिन्यांनंतर उघडले तरी बाटलीतून वास येत नाही.

लवंगासोबत स्टोअर करा

जर तुम्ही चहा, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ गरम पाण्याच्या बाटलीत ठेवले असतील तर त्यामुळे त्यात लवकर वास येऊ लागतो. जे साठवल्यानंतर आणखी दुर्गंधी येते. अशा परिस्थितीत साबण पाण्याच्या द्रावणाने बाटली पूर्णपणे स्वच्छ करा आणि ती कोरडी करा. नंतर त्यात दोन ते चार लवंगा टाकून त्यावर झाकण लावा. तुम्ही हे महिन्यांनंतरही बॉटलचे झाकण उघडले तरी तुम्हाला फक्त लवंगाचाच वास येईल. जे पाण्याने स्वच्छ करून काढता येते.

मीठ घाला

थर्मल बॉटल किंवा गरम-थंड पाण्याची बॉटल झाकण लावून ठेवण्याचा आणखी एक स्मार्ट मार्ग आहे. ज्यामुळे बाटलीच्या आतून येणारा वास दूर होऊ शकतो. जेव्हा केव्हा तुम्हाला बाटलीचे झाकण बंद ठेवावे लागेल तेव्हा ती साबण पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा. नंतर ते कोरडे करा. एक चमचा मीठ घाला आणि झाकण बंद करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग