How to Plan Tunganath trip: तुंगनाथ मंदिर हे महादेवांचे मंदिर १००० वर्षांहून अधिक जुने आहे. या मंदिराचा शोध आदि शंकराचार्यांनी लावल्याचे सांगितले जाते. या मंदिरात भगवान शिवाचे निवासस्थान आहे. या शिवाय देवी पार्वती आणि इतर अनेक देवतांच्या मूर्ती देखील या मंदिराजवळ आहेत. तुंगनाथ मंदिराची सुंदर वास्तुकला सर्वांनाच बघावीशी वाटते. पण इथे पोहचण्यासाठी तुम्हाला दुर्गम रस्त्यावरून ट्रेक करत जावं लागते. त्यामुळे इथे जाण्यासाठी याच छान प्लांनिंग करणे गरजेचे आहे. तुम्हीही या शिवरात्रीला येथे जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.
विमानाने जर जायचं असेल तर तुम्हाला डेहराडून जावे लागेल. जॉली ग्रँट विमानतळ हे चोपता जवळचे विमानतळ आहे, जे डेहराडून येथे आहे. विमानतळापासून चोपटाजवळील पांगर गावात जाण्यासाठी २२० किमी अंतर कापण्यासाठी सुमारे ९ तास लागतात. जर तुम्हाला ट्रेनने जायचे असेल तर तुम्ही डेहराडून, हरिद्वार आणि ऋषिकेशला जाऊ शकता. तिकडून तुम्हाला चोपट्याला जाता येते. जिथून तुम्ही तुंगनाथला जाऊ शकता. जर तुम्ही बाय रोड जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला प्रथम डेहराडूनच्या पांगर गावात आणि दिल्लीहून हरिद्वारला जावे लागेल आणि नंतर तेथून चोपटा येथे जावे लागेल.
> चोपटा ते तुंगनाथ पर्यंत कोणतेही मोठे थांबण्याचे ठिकाण नाही हे लक्षात घ्या. वाटेत पुरेसे पाणी, ट्रेकिंग शूज, उबदार कपडे, रेनकोट, सनस्क्रीन आणि प्रथमोपचार किट इत्यादी स्वतःसोबत ठेवा.
> गरज असेल तेव्हा खाण्यासाठी हलका स्नॅक्स सोबत ठेवा. हे पदार्थ एनर्जी देणारे असावेत, उदाहरणार्थ ग्लुकोज, चॉकलेट, बिस्किटे, ड्रायफ्रुट्स इत्यादी.
> बर्फावर घसरण्याची शक्यता असल्याने अतिरिक्त आधारासाठी चालण्याच्या काठ्या आणि वॉटरप्रूफ ट्रेकिंग शूज सोबत ठेवा.
> चोपट्यात राहण्यासाठी तुम्हाला रूम्स मिळतील.
> वाटेत चार्जिंग पॉइंट आणि एटीएम नसल्यामुळे पॉवर बँक आणि पैसे सोबत ठेवा.
> ही लक्षात घ्या की मंदिरात फोटो काढण्यास मनाई आहे.
> चोपटा ते मंदिराकडे जाताना रात्रीचे ट्रेकिंग टाळा.
> त्यामुळे थोडेसे नियोजन करून तुम्ही तुंगनाथला ट्रेकिंगला जाऊ शकता. मात्र, फुफ्फुस इत्यादींसंबंधी काही समस्या असल्यास येथे जाण्यापूर्वी थोडा विचार . करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)