Hair Fall दूर करून केसांना नवीन जीवन देईल होममेड बोटॉक्स क्रीम, पाहा बनवण्याची पद्धत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Fall दूर करून केसांना नवीन जीवन देईल होममेड बोटॉक्स क्रीम, पाहा बनवण्याची पद्धत

Hair Fall दूर करून केसांना नवीन जीवन देईल होममेड बोटॉक्स क्रीम, पाहा बनवण्याची पद्धत

Published Jul 16, 2024 01:58 PM IST

Botox For Hair: या ट्रीटमेंटमुळे केसांचा पोत सुधारतो, मुळापासून त्यांचे पोषण होते आणि ते दाट होतात. चला जाणून घेऊया घरगुती नैसर्गिक हेअर बोटॉक्स क्रीम कसे बनवायचे.

होममेड नॅचरल हेअर बोटॉक्स क्रीम
होममेड नॅचरल हेअर बोटॉक्स क्रीम

Tips to Naturally Botox at Home: बदलते हवामान, बिघडलेली जीवनशैली आणि अन्नातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अनेकदा केस निर्जीव आणि कोरडे होऊ लागतात. केस गळणे ही आजकाल प्रत्येक व्यक्तीसाठी मोठी समस्या बनली आहे. केसगळती टाळण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन अनेक महागडे ब्युटी ट्रीटमेंट घेण्यास देखील लोक फारसा विचार करत नाही. पण काही दिवसांनी ही समस्या परत येते. अशा वेळी तुम्हालाही हेअर फॉल, कोरड्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर हे होममेड नॅचरल हेअर बोटॉक्स क्रीम केसांना लावा. हेअर बोटॉक्स हे केसांना दिले जाणारे एक डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट आहे, जे खराब झालेल्या केसांच्या क्यूटिकल्सला केराटिनसारख्या फिलर घटकाने कोट करून केसांचा प्रत्येक भाग मजबूत करण्यास मदत करते. या ट्रीटमेंटमुळे केसांचा पोत सुधारतो, मुळापासून त्यांचे पोषण होते आणि ते दाट होतात. चला जाणून घेऊया होममेड नॅचरल हेअर बोटॉक्स क्रीम कसे बनवायचे.

होममेड नॅचरल हेअर बोटॉक्स क्रीम बनवण्याची पद्धत

एका पॅनमध्ये १ कप पाणी उकळण्यासाठी ठेवा. आता या उकळत्या पाण्यात २ चमचे जवसाच्या बिया टाका. या बिया सुमारे १० मिनिटे पाण्यात उकळू द्या. दरम्यान मध्ये मध्ये पाणी ढवळत राहा. आता पातळ चाळणी किंवा कापडाच्या साहाय्याने हे पाणी गाळून घ्या आणि थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर एका बाऊलमध्ये १ चमचा एरंडेल तेल, १ चमचा आवळा पावडर आणि १ चमचा कढीपत्ता पावडर मिक्स करा. आता आधीच थंड झालेले जवसाचे जेल बाऊलमध्ये टाकून ब्लेंडरमध्ये सर्व काही बारीक करून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

केसांवर कसे लावावे हेअर बोटॉक्स क्रीम

हेअर बोटॉक्स क्रीम केसांना लावण्यासाठी सर्वप्रथम केसांचे दोन भागात विभागणी करा आणि हेअर मास्क टाळूवर लावा. हेअर मास्क लावताना लक्षात ठेवा की केसांच्या लांबीमध्ये ते समप्रमाणात पसरवून लावावा लागेल. यानंतर हे जेल केसांना सुमारे ३० मिनिटे लावून ठेवा. यासाठी शॉवर कॅपने केस झाकून ठेवा. केसांवरील जेल कोरडे झाल्यावर कोमट पाणी आणि शॅम्पूच्या साहाय्याने केस चांगले धुवा. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून एकदा हा हेअर पॅक वापरा.

हेअर बोटॉक्स क्रीमचे फायदे

हेअर बोटॉक्स क्रीमरसाठी वापरल्या जाणाऱ्या जवसाच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ई असते, जे केसांना ओलावा देऊन केस तुटणे कमी करते. तर क्रीममध्ये वापरण्यात येणारे एरंडेल तेल केस दाट आणि लांब होण्यास मदत करते. आवळा पावडरमध्ये असलेले व्हिटॅमिन सी केसांची छिद्रे मजबूत करून केसांच्या वाढीस चालना देते. ज्यामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या उद्भवत नाही. याशिवाय यात वापरल्या जाणाऱ्या कढीपत्ता पावडरमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अमिनो अॅसिड भरपूर प्रमाणात असतात, जे केसगळती रोखून केसांच्या मुळांना मजबूत करण्याचे काम करतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner