Spring Roll Recipe: दिवाळी म्हटली की वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची नुसती रेलचेल असते. अगदी वसू बारस पासून भाऊबीज पर्यंत रोज नवीन पदार्थ बनवला जातो. शिवाय फराळाचे पदार्थ सोबतीला असतात. दिवाळीत रोज एक तरी गोड पदार्थ बनवला जातो किंवा बाहेरुन मिठाई आणली जाते. त्यामुळे रोज गोड पदार्थ खाल्ल्याने नंतर फार गोड खाण्याची इच्छा नसते. अशा वेळी या भाऊबीजला भावासाठी तुम्ही काही गोड पदार्थ बनवण्याचा विचार केला तर त्यासोबतच टेस्टी स्प्रिंग रोल्स बनवा. चायनीज फूड प्रेमींना ही रेसिपी खूप आवडेल. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या स्ट्रीट स्टाईल चाइनीज स्प्रिंग रोल कसे बनवायचे.
- १/२ कप मैदा
- १ अंडे
- १/४ टीस्पून मीठ
- १/४ कप पाणी
- १/४ कप दूध
- ३ चमचे (तेल आणि पाणी एकत्र मिसळून) तेल
- १ कप बारीक चिरलेली कोबी
- १ कप हिरवा कांदा
- १ कप बारीक चिरलेले गाजर
- १/२ टीस्पून मीठ
- २ टेबलस्पून तेल
- ४ पाकळ्या लसूण
- १ टीस्पून सोया सॉस
- २ टेबलस्पून सेलरी
- १ टेबलस्पून मैदा (पाण्याने पेस्ट बनवण्यासाठी)
- तळण्यासाठी तेल
टेस्टी स्प्रिंग रोल बनवण्यासाठी प्रथम एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात लसूण आणि कांदा घालून मंद आचेवर कांदा मऊ होईपर्यंत भाजा. यानंतर कढईत उरलेल्या भाज्या टाका आणि थोडा वेळ मंद आचेवर शिजवा. त्यात सर्व सॉस आणि उरलेले सर्व साहित्य घाला आणि थोडा वेळ मोठ्या आचेवर शिजवा. आता एक एक पॅन घ्या आणि तयार केलेले पिठ त्याच्या कडांवर लावा आणि त्यात फीलिंग भरा. यानंतर शेवटपर्यंत दुमडून घ्या. मैदा आणि पाणी मिक्स करुन त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट कडांवर लावून व्यवस्थित बंद करा. जेणेकरून स्प्रिंग रोलचा मसाला तळताना फुटणार नाही. आता हे दोन वेळा तळून घ्या आणि नंतर कट करुन सर्व्ह करा.
संबंधित बातम्या