Watermelon Shake Recipe: उन्हाळ्यात कडक ऊन आणि उष्णतेचे परिणाम ताबडतोब कमी करण्यासाठी लोक सहसा कोल्ड ड्रिंक घेतात. परंतु कोल्ड ड्रिंक्सचे अतिसेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात आरोग्यासाठी वरदान मानला जाणाऱ्या टरबूजपासून तुम्ही शेक बनवू शकता. उन्हाळ्यात टरबूज आवडीने खाल्ले जाते. तुम्ही टरबूजपासून फक्त ज्यूसच नाही तर त्याचा शेक सुद्धा बनवू शकता. टरबूज शेक बनवणे सोपे आहे. हा टेस्टी टरबूज शेक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. शिवाय टरबूज आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने हे प्यायल्याने तुम्हाला फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया घरी टरबूज शेक कसा बनवायचा.
- १ कप टरबूजचे तुकडे (बी नसलेले)
- १/४ कप कंडेन्स्ड मिल्क किंवा २ कप दूध
- दीड कप पाणी (फक्त कंडेन्स्ड मिल्क वापरत असल्यास)
- १/२ व्हॅनिला एक्सट्रॅक्ट (पर्यायी)
- आईस्क्रीम
-काही बर्फाचे तुकडे
- चवीनुसार साखर (दूध वापरत असल्यास)
टरबूज शेक बनवण्यासाठी सर्वात आधी टरबूजच्या बिया काढून त्याचे तुकडे करून घ्या. आता ब्लेंडरच्या जारमध्ये हे तुकडे टाका. त्यात कंडेन्स्ड मिल्क किंवा दूध घाला. जर तुम्ही कंडेन्स्ड मिल्क वापरत असाल तर तुम्हाला पाणी वापरावे लागेल. आणि जर दूध वापरत असाल चवीनुसार साखर टाका. आता हे ब्लेंडरमध्ये चांगले ब्लेंड करून घ्या. तुम्हाला आवडेल अशी कंसिटंन्सी येईपर्यंत नीट ब्लेंड करा. तुम्ही ब्लेंड करताना काही बर्फाचे तुकडे टाकू शकता. आता सर्व्ह करण्यासाठी एका ग्लासमध्ये आधी बर्फाचे तुकडे घाला. नंतर तयार केलेला टरबूज शेक घाला. आता वरून आईस्क्रीम घाला आणि थंडगार सर्व्ह करा. तुम्हाला आईस्क्रीम नको असेल तर तुम्ही ते स्क्रीप करू शकता.
संबंधित बातम्या