मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Virgin Mojito: घरी सोप्या पद्धतीने बनवा मार्केटसारखे व्हर्जिन मोईतो, नोट करा रेसिपी

Virgin Mojito: घरी सोप्या पद्धतीने बनवा मार्केटसारखे व्हर्जिन मोईतो, नोट करा रेसिपी

May 21, 2024 08:17 PM IST

Summer Special Drinks: बाहेर जेवायला गेल्यानंतर त्यासोबत ड्रिंकमध्ये अनेक लोकांना व्हर्जिन मोईतो प्यायला आवडते. तुम्ही हे घरी सुद्धा बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

व्हर्जिन मोईतोची रेसिपी
व्हर्जिन मोईतोची रेसिपी (freepik)

Virgin Mojito Recipe: तुम्ही जेव्हा जेव्हा बाहेर लंच किंवा डिनरसाठी जात असाल तेव्हा तुम्ही एकदा तरी व्हर्जिन मोईतो ड्रिंक प्यायले असाल. असे असू शकते की तुम्ही नेहमी हे ड्रिंक ऑर्डर करत असाल. अनेक लोकांना जेवणासोबत काहीतरी ड्रिंक प्यायला आवडते. बहुतेक लोकांना व्हर्जिन मोईतो प्यायला आवडते. या उन्हाळ्यात तुम्हाला ते प्यायला प्रत्येक वेळी बाहेर हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही ते घरी सुद्धा सहज बनवू शकता. हे घरी बनवणे खूप सोपे आहे आणि झटपट तयार होते. चला तर मग जाणून घ्या घरी कसे बनवावे व्हर्जिन मोईतो.

ट्रेंडिंग न्यूज

व्हर्जिन मोईतो बनवण्यासाठी साहित्य

- १ बॉटल सोडा किंवा व्हाईट कोल्ड ड्रिंक

- ४ लिंबू

- १५ ते २० पुदिन्याची पाने

- १/२ वाटी बारीक केलेली साखर

- बर्फाचे तुकडे

व्हर्जिन मोईतो बनवण्याची पद्धत

घरी व्हर्जिन मोईतो बनवण्यासाठी प्रथम लिंबू गोल आकारात कापून घ्या. नंतर एका भांड्यात ५ -६ लिंबूचे तुकडे, पुदिन्याची पाने आणि साखर घाला आणि हलक्या हाताने बारीक करून घ्या. आता एक एक ग्लास घ्या आणि त्यात बर्फाचे तुकडे आणि कुटलेले पुदिन्याचे मिश्रण घाला. आता ग्लासमध्ये सोडा किंवा व्हाईट कोल्ड ड्रिंक मिक्स करा. 

आता उरलेले लिंबाचे तुकडे आणि पुदिन्याच्या पानांनी सजवा. तुमचे व्हर्जिन मोईतो तयार आहे. थंडगार सर्व्ह करा.

WhatsApp channel
विभाग