Korean Face Pack With Chia Seeds: चिया सीड्स आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, प्रथिने आणि कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असतात. या बिया पाण्यात भिजवल्याने ते फुगतात आणि जेलीसारखे दिसतात. कोरियन महिला या सीड्सच्या मदतीने फेस पॅक तयार करतात. या बियांपासून बनवलेला फेस पॅक त्वचेला चमक देण्यास मदत करतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कोरियन महिला चिया सीड्सपासून बनवलेला फेस पॅक वापरत आहे. हा पॅक लावल्याने त्वचेवर चमक येते. येथे जाणून घ्या हा फेस पॅक कसा बनवायचा.
हा पॅक बनवण्यासाठी तुम्हाला फक्त दोनच गोष्टींची गरज आहे, चिया सीड्स आणि दूध. पॅक बनवण्यासाठी आवश्यकतेनुसार दोन चमचे चिया सीड्स दुधात मिक्स करा. ते चांगले मिसळा आणि किमान एक तास भिजत ठेवा. जेव्हा या बिया चांगल्या फुगतील तेव्हा हे पुन्हा नीट मिक्स करा. आता हा पॅक तयार आहे.
हा फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यासाठी प्रथम चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. त्वचा साफ करण्यासाठी तुम्ही क्लींजिंग मिल्क वापरू शकता. चेहरा पूर्णपणे स्वच्छ झाल्यावर चेहऱ्यावर कोरियन फेस पॅक लावा. साधारण २० ते २५ मिनिटे हा चेहऱ्यावर राहू द्या. नंतर त्वचा स्वच्छ करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)