Gauri Ganpati Recipe: गौराईच्या नैवेद्याला आवर्जून बनवली जाते भोपळ्याची भाजी, नोट करा विदर्भ स्टाईल रेसिपी-how to make vidarbha style pumpkin bhaji recipe for gauri ganpati bhog ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Gauri Ganpati Recipe: गौराईच्या नैवेद्याला आवर्जून बनवली जाते भोपळ्याची भाजी, नोट करा विदर्भ स्टाईल रेसिपी

Gauri Ganpati Recipe: गौराईच्या नैवेद्याला आवर्जून बनवली जाते भोपळ्याची भाजी, नोट करा विदर्भ स्टाईल रेसिपी

Sep 09, 2024 07:58 PM IST

Gauri Ganpati Bhog Recipe: १० सप्टेंबर रोजी गौराईचे आवाहन होणार आहे. गौराईच्या नैवेद्याला भोपळ्याची भाजी बनवली जाते. तुम्हाला ही भाजी घरी बनवायची असेल तर ही रेसिपी फॉलो करा.

Gauri Ganpati Recipe: विदर्भ स्टाईल भोपळ्याची भाजी
Gauri Ganpati Recipe: विदर्भ स्टाईल भोपळ्याची भाजी (freepik)

Vidarbha Style Pumpkin Bahji Recipe: गणपती बाप्पाच्या आगमनानंतर गौराई तीन दिवस माहेरी येतात. १० सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन होणार असून, ११ सप्टेंबर रोजी पूजन होईल. गौराईच्या पूजनासाठी विविध प्रकारचे पदार्थ केले जातात. या भोपळ्याची भाजी, सोळा भाज्याची मिक्स भाजी, सोळा चटण्या, आंबिल, कतली यांना विशेष महत्त्व असते. गौराईच्या नैवेद्यासाठी बनवली जाणारी भोपळ्याची भाजी तुम्हाला घरी बनवायची असेल तर तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता. या भाजी विदर्भात कोहळ्याची भाजी म्हणतात. तसेच काही ठिकाणी काशिफळ देखील म्हणतात. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि लवकर तयार होते. चला तर मग जाणून घ्या विदर्भ स्टाईल भोपळ्याची भाजी कशी बनवावी.

भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य

- लाल भोपळा

- आंबड चुका

- पालक

- कांदा

- लसूण

- हिरवी मिरची

- कोथिंबीर

- खोबरं

- खसखस

- जिरं

- मोहरी

- हळद

- धने पावडर

- गरम मसाला

- तेल

- मीठ

भोपळ्याची भाजी बनवण्याची पद्धत

विदर्भ स्टाईल भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम लाल भोपळ्याची चौकोन तुकडे कापून घ्या. याचे साल काढू नका. तसेच थोडेसे पालक, आंबटचुकाची भाजी सुद्धा धुवून बारीक चिरून घ्या. आता कांदा आणि खोबरं वेगवेगळे लालसर भाजून घ्या. हे भाजल्यानंतर यात थोडी खसखस टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. ही पेस्ट बाजूला ठेवा. आता लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. या भाजीमध्ये लाल तिखट वापरत नसल्यामुळे तुम्हाला जेवढे तिखट हवे त्यानुसार हिरव्या मिरच्या घ्यावा. सर्व मसाले बारीक करून बाजूला ठेवा.

आता एका कढईत तेल गरम करा. इतर भाज्यांच्या तुलनेत थोडे जास्त तेल घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात जिरं, मोहरी आणि हिंग टाका. आता यात कांदा, खोबऱ्याची तयार केलेली पेस्ट टाकून चांगली भाजून घ्या. नंतर यात थोडेसे पालक, आंबटचुका टाकून शिजवून घ्या. हे शिजवण्यासाठी थोडेसे पाणी टाकून झाकून शिजवा. आता यात हळद, धने पावडर, गरम मसाला, मीठ टाकून मिक्स करा. तुम्हाला नको असेल तर तुम्ही गरम मसाला स्किप करू शकता. आता यात भोपळ्याचे काप टाकून मिक्स करून घ्या. यात थोडेसे पाणी टाकून झाकण टाकून शिजवा. तुम्हाला कांदा, लसूण नको असेल तर तुम्ही ते स्किप सुद्धा करू शकता. तुमची भोपळ्याची भाजी तयार आहे.

Whats_app_banner