Home Remedies: छातीत कफ जमा झाला का? लावा घरी बनवलेले हे विक्स
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Home Remedies: छातीत कफ जमा झाला का? लावा घरी बनवलेले हे विक्स

Home Remedies: छातीत कफ जमा झाला का? लावा घरी बनवलेले हे विक्स

Jan 16, 2024 11:44 PM IST

Homemade Vicks for Kids: सर्दी खोकला झाल्यावर लहान मुले असो वा मोठे सर्वांनाच त्रास होतो. कारण कफ छातीत जमा झाल्याने जडपणा येतो. विशेषत: जर मुलांना असा त्रास होत असेल तर घरी बनवलेले विक्स लावू शकता. कसे बनवावे आणि वापरावे ते जाणून घ्या.

मुलांसाठी घरी विक्स कसे बनवावे
मुलांसाठी घरी विक्स कसे बनवावे (unsplash)

Home Remedies for Congestion: हिवाळ्यात थंडीचा मुलांना जास्त त्रास होतो. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे मुले सहजपणे सर्दी आणि खोकल्याला बळी पडतात. त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. कफ छातीत आणि नाकात जमा होते आणि यामुळे मूल नीट श्वास घेऊ शकत नाही. अशा स्थितीत बाजारातील विक्स वापरण्याऐवजी हे घरगुती विक्स लावा. याचा परिणाम जलद होईल आणि मुलाच्या छातीतील कफ निघून जाईल. जाणून घ्या हे कसे बनवावे आणि वापरावे.

होममेड विक्स कसे बनवायचे

घरी विक्स बनवण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता आहे. पहिले म्हणजे घरी बनवलेले शुद्ध तूप आणि दुसरे म्हणजे शुद्ध कापूर. सोबत दोन चिमूट सैंधव मीठ घ्या. कढईत देशी तूप गरम करून त्यात ८-१० कापूरची पावडर करुन घाला. कापूर अगदी सहज पावडरमध्ये बदलतो. तसेच दोन चिमूटभर सैंधव मीठ घालावे. आता या तीन गोष्टी मंद आचेवर गरम करा. लक्षात ठेवा गॅसची फ्लेम खूप मंद असावी. अन्यथा तुपामुळे कढईला किंवा चमच्याला आग लागू शकते. गॅस बंद केल्यानंतर तूप झाकून ठेवा. ते थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा. तुमचे होममेड विक्स तयार आहे.

 

वापरताना घ्या ही खबरदारी

हे घरगुती विक्स मुलाच्या पायावर लावा आणि मोजे घाला. छातीत कफ जमा झाल्यास छातीवर लावा. यामुळे मुलांना खोकल्यामुळे होणाऱ्या त्रासापासून आराम मिळतो. हे देसी विक्स थेट नाकावर किंवा कापलेल्या त्वचेवर लावू नका. अन्यथा जळजळ होते आणि कापूर त्वचेत गेल्यास नुकसान देखील होऊ शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner