मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Makar Sankranti ला आवर्जुन बनवली जाते उडीद डाळ खिचडी, नोट करा रेसिपी

Makar Sankranti ला आवर्जुन बनवली जाते उडीद डाळ खिचडी, नोट करा रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 13, 2024 06:59 PM IST

Makar Sankranti Special Recipe: मकर संक्रांतीला जसे तिळगुळाला महत्त्व आहे तसेच अनेक लोक उडीद डाळ खिचडी सुद्धा बनवतात. घरी सोप्या पद्धतीने बनवण्यासाठी ही रेसिपी फॉलो करा.

उडीद डाळ खिचडी
उडीद डाळ खिचडी

Urad Dal Khichdi Recipe: सूर्य देवाने मकर राशीत प्रवेश केल्‍यास मकर संक्रांत म्हणतात. यावर्षी मकर संक्रांतीचा सण १५ जानेवारी रोजी साजरा होणार आहे. मकर संक्रांतीला तिळगुळाला विशेष महत्त्व आहे. यासोबत अनेक दुसरे पदार्थ सुद्धा आवर्जुन बनवले जातात. त्यापैकी एक म्हणजे उडीद डाळ खिचडी. उडदाच्या डाळीची खिचडी खाण्यास चविष्ट तर आहेच पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया कशी बनवायची उडीद डाळ खिचडी.

उडीद डाळ खिचडी बनवण्यासाठी साहित्य

- तांदूळ २०० ग्रॅम

- साल असलेली उडदाची डाळ १५० ग्रॅम

- हिरवे वाटाणे १ लहान वाटी

- कोथिंबीर १ टेबलस्पून

- हिरवी मिरची २ ( बारीक चिरून)

- आले १ इंच तुकडा (बारीक चिरून)

- हळद १/२ टीस्पून

- जिरे १ टीस्पून

- हिंग १ चिमूटभर

- तूप २ टेबलस्पून

- मीठ चवीनुसार

उडीद डाळ खिचडी बनवण्याची पद्धत

उडीद डाळ खिचडी बनवण्यासाठी प्रथम तांदूळ नीट धुवून थोडा वेळ भिजवा. यानंतर कुकरमध्ये तूप गरम करून त्यात हिंग व जिरे टाका. जिरे चांगले भाजून झाल्यावर त्यात हिरवी मिरची, आले, हळद आणि वाटाणे घालून २ मिनिटे परतून घ्या. यानंतर त्यात तांदूळ घाला आणि २-३ मिनिटे परतून घ्या. तांदूळ मसाल्याबरोबर चांगले भाजून झाल्यावर त्यात डाळ टाका. आता त्यात तांदळाच्या चौपट पाणी घालून कुकर बंद करा. आता १-२ शिट्ट्यानंतर खिचडी मंद आचेवर ५ मिनिटे शिजू द्या. यानंतर गॅस बंद करा आणि कुकरमधील प्रेशर सुटल्यावरच कुकरचे झाकण उघडा. तुमची उडीद डाळ खिचडी तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.

WhatsApp channel