मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tricolour Barfi: प्रजासत्ताक दिनाला बनवा तिरंगा बर्फी, वाढवा देशभक्तीचा गोडवा

Tricolour Barfi: प्रजासत्ताक दिनाला बनवा तिरंगा बर्फी, वाढवा देशभक्तीचा गोडवा

Jan 24, 2024 10:54 PM IST

Republic Day Recipe: प्रजासत्ताक दिनाला अनेक लोक घरी तिरंग्याच्या रंगाच्या रेसिपी बनवतात. तुम्ही सुद्धा असे काही बनवण्याचा विचार करत असाल तर तिरंगी बर्फीची ही रेसिपी ट्राय करा.

तिरंगा बर्फी
तिरंगा बर्फी

Tiranga Barfi Recipe: प्रसंग कोणताही असो उत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला फक्त निमित्त हवे असते .राष्ट्रीय सण यातून का सुटतील? देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन मिठाई शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे या निमित्ताने तोंड गोड करण्यासाठी तुम्ही ही तिरंगा बर्फीची रेसिपी बनवू शकता. हे खायला जेवढे टेस्टी तेवढे बनवयाला खूप सोपी आहे. चला तर मग जाणून घ्या तिरंगा बर्फी कशी बनवायची.

तिरंगा बर्फी बनण्यासाठी साहित्य

- मावा/खवा ४०० ग्रॅम

ट्रेंडिंग न्यूज

- साखर ३५० ग्रॅम

- तूप १०० ग्रॅम

- बदाम ८-१० बारीक चिरलेले

- पिस्ते ८-१० बारीक चिरलेले

- काजू ८-१० बारीक चिरलेले

- खोबरा कीस २ चमचे

- खाण्याचा हिरवा रंग २ -३ थेंब

- केशरी रंग २ ते ३ थेंब

केशर २ चिमूटभर

तिरंगा बर्फी बनवण्याची पद्धत

तिरंगा बर्फी बनवण्यासाठी प्रथम कढईत तूप गरम करून त्यात बदाम, पिस्ते आणि काजू हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. यानंतर कढईत खवा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात साखर घाला आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहा. आता भाजलेला खवा एका प्लेटमध्ये काढून त्याचे तीन भाग करा. यानंतर खव्याच्या एका भागात हिरवा रंग, दुसऱ्या भागात केशरी रंग किंवा थोडेसे केशर मिसळावे. तर पांढर्‍या रंगासाठी खव्याच्या एका भागावर खोबऱ्याचा कीस टाका. आता प्रथम एका प्लेटमध्ये हिरव्या खव्याचा थर ठेवा. नंतर पांढरा खव्याचा थर घाला आणि नंतर केशरी रंगाच्या खव्याचा थर घाला. यानंतर खव्यावर बारीक चिरलेले बदाम आणि पिस्ता लावा आणि सेट होऊ द्या. तुमची तिरंगा बर्फी तयार आहे. त्याला तुम्हाला आवडेल त्या आकारात कापून सर्व्ह करा.

WhatsApp channel