Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाची तयारी सगळीकडे सुरु झाली आहे. या दिवशी सोसायटी ते ऑफिस सगळीकडेच वेगवगेळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केले जाते. या दिवशी कपड्यांपासून ते खाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांना तिरंग्याचा रंग हवा असतो. अशावेळी तुम्ही ट्राय कलर रंगाचे (Republic Day Recipes) पदार्थ बनवू शकता. तुम्ही नक्की काय बनवायचे याचा विचार करत असाल, जे तीन रंगात आले पाहिजे, ते छान दिसावे आणि बनवायला सोपे असेल. तर आम्ही तुमची मदत करणार आहोत. आम्ही तुम्हाला ट्राय कलर सँडविचची रेसिपी सांगत आहोत. जे बनवायला सोपे आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे. मुलेही हे सँडविच आवर्जून खातील. जाणून घ्या तिरंगा सँडविच कसा बनवायचा.
ब्रेड, १ वाटी मेयोनेझ, चीज स्लाईस , १ वाटी गाजर, १ वाटी पालक, चिली फ्लेक्स, टोमॅटो सॉस सुमारे २ चमचे आणि तुमच्या चवीनुसार मीठ आवश्यक आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सँडविचमध्ये काळी मिरी वापरू शकता.
> सँडविच बनवण्यासाठी प्रथम ब्रेड एका बाजूला टोस्ट करून त्यावर हिरव्या कोथिंबीरीची चटणी लावा.
> आता ब्रेडवर पालक किंवा काकडीचा जाड थर लावा आणि वर एक ब्रेड ठेवा.
> आता दुस-या लेयरमध्ये ब्रेडवर मेयोनेझ लावा आणि चीजचा स्लाईस ठेवा.
> आता शेवटच्या आणि तिसऱ्या थरावर, प्रथम ब्रेडवर टोमॅटो सॉस लावा.
> किसलेल्या गाजराचा जाड थर सॉसवर लावा.
> आता हे सँडविच तव्यावर हलके टोस्ट करा किंवा जसे आहे तसे राहू द्या.
> सँडविच सारख्या त्रिकोणी आकारात ब्रेड कापून घ्या ज्यामुळे हे अजून सुंदर दिसेल.
> नाश्त्यासाठी ट्राय कलर सँडविच तयार आहे.