Rum Cake: ख्रिसमस पार्टीसाठी बनवा पारंपारिक रम केक, नोट करा ही रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rum Cake: ख्रिसमस पार्टीसाठी बनवा पारंपारिक रम केक, नोट करा ही रेसिपी

Rum Cake: ख्रिसमस पार्टीसाठी बनवा पारंपारिक रम केक, नोट करा ही रेसिपी

Published Dec 25, 2023 02:00 PM IST

Christmas Special Recipe: ख्रिसमसला रम केक आवर्जुन बनवला जातो. तुम्ही हा केक घरी सहज बनवू शकता. बनवण्यासाठी ही रेसिपी पाहा.

ख्रिसमससाठी रम केक
ख्रिसमससाठी रम केक (Freepik)

Traditional Rum Cake Recipe: ख्रिसमसची पार्टी केक शिवाय अपूर्ण वाटते. ख्रिसमस म्हटले की सांता क्लॉज, गिफ्ट्स हे जसे डोळ्यांसमोर येते. तसेच केकचा विचार सुद्धा पहिले येतो. ख्रिसमसला बरेच लोक बाहेरून केक विकत आणतात. तर काही लोक घरी बनवतात. या दिवशी रम केक आवडीने खाल्ला जातो. हा पारंपारिक केक तुम्ही घरी सहज बनवू शकता. ख्रिसमस पार्टीसाठी घरच्या घरी पारंपारिक रम केक बनवण्यासाठी ही रेसिपी फॉलो करा.

रम केक बनवण्यासाठी साहित्य

- मैदा अडीच कप

- बेकिंग पावडर १ १/४ टीस्पून

- मीठ १ टीस्पून

- बेकिंग सोडा १/४ टीस्पून

- साखर ३/४ कप

- अनसॉल्टेड बटर वितळलेले १० चमचे

- ताक १/२ कप

- रम १/२ कप

- तेल ३ टेबलस्पून

- व्हॅनिला इसेंस १ टेबलस्पून

- अंड्यातील पिवळ बलक ६

- अंड्याचा पांढरा भाग ३

- बटर १/२ कप

- साखर १ कम

- रम १/४ कप

- पाणी १/४ कप

रम केक बनवण्याची पद्धत

केक बनवण्यासाठी प्रथम ओव्हन प्रीहीट करून घ्या. यासाठी ते ३५० अंशांवर गरम करा. नंतर एका मोठ्या भांड्यात केकचे पीठ, बेकिंग पावडर, मीठ, बेकिंग सोडा आणि थोडी साखर एकत्र मिक्स करा. नंतर दुसख्या भांड्यात वितळलेले लोणी, ताक, रम, तेल, व्हॅनिला इसेंस आणि अंड्यातील पिवळ बलक एकत्र फेटा. आता अंड्याचा पांढरा भाग फेसाळ होईपर्यंत फेटा. फेटताना त्यात साखर घाला. हे बॅटर व्हीप होईपर्यंत ते फेटत राहा. एका वेगळ्या भांड्यात व्हीप्ड अंड्याचा पांढरा भाग काढून बाजूला ठेवा. आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये पिठाचे मिश्रण घाला. नंतर हळूहळू ते बटरच्या मिश्रणात घालून मिक्स करा. हे मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत फेटून घ्या. आता या मिश्रणात व्हीप्ड व्हाईट क्रीम घाला आणि चांगले मिक्स करा.

आता एक पॅन कुकिंग स्प्रेने नीट ग्रीस करा. नंतर पॅनच्या आतील बाजूस काही चमचे साखर घाला आणि हलक्या हाताने टॅप करा. पॅनच्या आतील सर्व बाजूने साखर नीट कोट होईपर्यंत टॅप करा. आता त्यात समान प्रमाणात मिश्रण घाला. नंतर ४०-५० मिनिटे बेक करावे. केक तयार झाला की थंड होऊ द्या. नंतर एका सॉसपॅनमध्ये साखर, बटर आणि पाणी एकत्र होईपर्यंत फेटा आणि उकळी आणा. यानंतर हळूहळू त्यात रम घाला. फक्त एक उकळी आणा आणि गॅस बंद करा. नंतर हे केकवर घाला. ५-१० मिनिटे थांबा आणि नंतर केक प्लेटमध्ये काढा. नंतर उरलेले रम सॉस त्यावर घाला. तुमचा पारंपारिक रम केक तयार आहे.

Whats_app_banner