Tiranga Sandwich Recipe: १५ ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खास असतो. स्वातंत्र्य दिनी देशवासीय मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद साजरा करतात. हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्हालाही आपल्या स्वयंपाकघरात तिरंगा रेसिपी बनवायची असेल तर झटपट तिरंगा सँडविच बनवा. तिरंगा सँडविच बनवायला अतिशय सोपे तर आहेच, पण खायला टेस्टी आणि हेल्दी सुद्धा आहे. इतकंच नाही तर घरातील लहान मुलं सुद्धा ही रेसिपी अगदी सहज तयार करू शकतात. चला तर मग उशीर न करता तिरंगा सँडविच कसे बनवायचे ते जाणून घेऊया.
- ८ ते १० ब्रेड स्लाइस
- अर्धा कप किसलेली काकडी
- अर्धा कप किसलेले गाजर
- एक कप मेयोनीज
- दोन चमचे टोमॅटो केचप
- दोन चमचे हिरवी चटणी
- दोन चमचे बटर
- चवीनुसार मीठ
तिरंगा सँडविच बनविण्यासाठी प्रथम वेगवेगळ्या भांड्यात काकडी आणि गाजर किसून घ्या. यानंतर किसलेल्या काकडीत पुदिन्याची चटणी आणि मीठ टाकून चांगले मिक्स करा. आता दुसऱ्या भांड्यात मेयोनीजमध्ये थोडे मीठ घाला. आता ब्रेडस्लाइस घेऊन त्यावर बटर लावा. आता त्यावर पुदिन्याची चटणी आणि किसलेली काकडी नीट पसरवून घ्या. दुसऱ्या ब्रेड स्लाइसवर मेयोनीज लावा आणि काकडीच्या ब्रेड स्लाइसच्या वर ठेवा. आता दुसऱ्या ब्रेड स्लाइसवर लोणी लावा आणि त्यावर किसलेले गाजर पसरवून वर मसाला घाला. शेवटी सँडविचच्या वर आणखी एक ब्रेड स्लाइस ठेवा. तुमचे टेस्टी आणि हेल्दी तिरंगा सँडविच तयार आहे.
नाश्त्यात किंवा मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये तुम्ही केचपसोबत तिरंगा सँडविच सर्व्ह करू शकता. तसेच तुम्ही हे संध्याकाळी चहासोबत सुद्धा खाऊ शकता. या तिरंगा सँडविचची विशेषता म्हणजे लहान मुलेही भूक लागल्यावर ही रेसिपी सहज तयार करू शकतात.