मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tilgul Modak: संकष्टी चतुर्थीला बाप्पाला अर्पण करा तिळगुळाच्या मोदकांचा नैवेद्य, सोपी आहे रेसिपी

Tilgul Modak: संकष्टी चतुर्थीला बाप्पाला अर्पण करा तिळगुळाच्या मोदकांचा नैवेद्य, सोपी आहे रेसिपी

Jan 29, 2024 02:19 PM IST

Sankashti Chaturthi Special Recipe: आज संकष्टी चतुर्थीला गणपतीला तिळगुळाचे नैवेद्य अर्पण करावे, असे म्हटले जाते. तुम्ही तिळगुळाचे मोदक बनवू शकता. कसे ते जाणून घ्या.

तिळगुळाचे मोदक
तिळगुळाचे मोदक

Tilgul Modak Recipe: आज देशभरात संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जात आहे. पौष महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीला गणेशाला तिळगुळाचे मोदकाचे नैवेद्य अर्पण करावे असे मानले जाते. केवळ पौष महिन्यात तिळगुळाचे अती महत्त्व असल्याने हे उपावासाला देखील खायला चालते. फक्त धार्मिकच नाही तर तिळगुळ हे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. संध्याकाळी गणपती बाप्पाची पूजा करता तुम्हाला सुद्धा नैवेद्यमध्ये तिळगुळ किंवा तिळगुळाचे मोदक बनवायचे असेल तर ही रेसिपी ट्राय करा. हे बनवायला खूप सोपे आहे. जाणून घ्या रेसिपी

तिळगुळाचे मोदक बनवण्यासाठी साहित्य

- पांढरे तीळ

ट्रेंडिंग न्यूज

- गूळ

- तूप

- ड्रायफ्रुट्स

तिळगुळाचे मोदक बनवण्याची पद्धत

तिळगुळाचे मोदक बनवण्यासाठी प्रथम तिळगुळ तयार करावे लागेल. यासाठी तुम्ही थोडे हलके भाजलेले तिळ वापरू शकता. किंवा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे थोडाशा तुपात सुद्धा भाजू शकता. तीळ भाजून घ्या आणि बाजूला ठेवा. आता थोड्याशा तूपात ड्रायफ्रूट्स भाजून घ्या. यानंतर भाजलेले तीळ ग्राइंडरमध्ये ठेवून बारीक वाटून घ्या. आता तिळामध्ये गूळ घालून पुन्हा तीळ सोबत चांगले बारीक करून घ्या. तुम्ही यात ड्रायफ्रूट्स सुद्धा बारीक करू शकता. किंवा बारीक काप करून वापरू शकता. आता हे तिळगुळ घेऊन मोदकच्या साच्यात ठेवा आणि मोदक तयार करा. तुमचे तिळगुळाचे मोदक तयार आहे.

WhatsApp channel