मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Makar Sankranti: मकर संक्रातीला घरी बनवा तिळगुळाचे लाडू, पाहा रेसिपी आणि फायदे

Makar Sankranti: मकर संक्रातीला घरी बनवा तिळगुळाचे लाडू, पाहा रेसिपी आणि फायदे

Jan 08, 2024 05:09 PM IST

Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीचा सण काही दिवसात येणार आहे. मकर संक्रांतीला तिळगुळ बनवले जाते. घरी तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे जाणून घ्या.

तिळगुळाचे लाडू
तिळगुळाचे लाडू (Freepik)

Tilgul Laddu Recipe: हिवाळ्यात तीळ खाल्ल्याने शरीराला असंख्य फायदे होतात. तीळ केवळ शरीराला उबदार ठेवत नाही तर कामासाठी ऊर्जा देखील देतात. प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, तांबे, फायबर, बी कॉम्प्लेक्स आणि कार्बोहायड्रेट्स असे अनेक पोषक तत्वे तिळात आढळतात. याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. मकर संक्रांतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मकर संक्रांतीला तिळगुळाचे महत्त्व आहे. तुम्हाला तिळगुळाचे लाडू बनवायचे असेल तर ही रेसिपी फॉलो करा.

ट्रेंडिंग न्यूज

तिळागुळाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य

- २५० ग्रॅम तीळ

- २५० ग्रॅम गूळ

- २ टेबलस्पून काजू

- २ टेबलस्पून बदाम

- ७ ते ८ वेलची

- २ चमचे तूप

तिळगुळाचे लाडू बनवण्याची पद्धत

तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी प्रथम तीळ नीट स्वच्छ करून घ्या. यानंतर पॅन गरम करा आणि मध्यम आचेवर तीळ भाजून घ्या. हे हलके तपकिरी होईपर्यंत सतत ढवळत राहा. भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढून थोडे थंड करा. भाजलेल्या तिळापैकी अर्धे तिळ बाजूला काढा आणि हलके कुस्करून घ्या. आता कढईत एक चमचा तूप गरम करून त्यात गूळ घालून मंद आचेवर गूळ वितळवून घ्या. गूळ वितळताच गॅस बंद करा. यानंतर गूळ थंड होताच, त्यात भाजलेले तीळ चांगले मिक्स करा. यानंतर त्यात काजू, बदाम आणि वेलची पूड घाला. तुमचे तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे. हे कढईतून ताटात काढा आणि थोडं थंड झाल्यावर हाताला तूप लावून थोडे थोडे मिश्रण घेऊन लाडू बनवा. तुमचे टेस्टी तिळगुळाचे लाडू तयार आहेत.

तिळगुळाचे लाडू खाण्याचे फायदे

- तिळामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी त्वचेला तरुण आणि चमकदार ठेवण्यास मदत करते.

- हिवाळ्यात वात वाढल्याने सांधेदुखीचा त्रास होतो. पण तीळ खाल्ल्याने पायांची सूज कमी होते.

- छातीत जळजळ आणि सायनसच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर हे तिळाचे लाडू जरूर खा. यामुळे शरीर आतून उबदार राहते.

- तिळाचे लाडू बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहेत.

- तिळाचे सेवन केल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असे एका अभ्यासात सांगितले आहे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

WhatsApp channel