Makar Sankranti Laddu Recipe: हिवाळा ऋतू सुरु आहे. या ऋतूत मस्त मस्त पदार्थ (Winter Food Item) करून खाल्ले जातात. वातावरण छान असल्यामुळे हे पदार्थ पचतातही. पण हा ऋतू खूप सुंदर असला तरी हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. काळजी न घेतल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. हिवाळ्यात आपल्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करणे गरजेचे असते, ज्यामुळे शरीराला ऊब मिळेल. हिवाळ्यात आवर्जून वेगवगेळे प्रकारचे लाडू बनवतात. हे लाडू आपल्याला हिवाळ्यात उर्जावान ठेवण्यास मदतही करतात. अशातच तिळ गुळाचे लाडू हा उत्तम पर्याय आहे. याचे सेवन केल्याने शरीर उबदार तर राहतेच, शिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढते. काही दिवसातच आता मकरसंक्रांती येणार आहे. या सणाला तर आवर्जून तीळ-गुळाचे लाडू बनवले जातात. याचसाठी जाणून घेऊयात लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि रेसिपी!
गूळ - १ कप
तीळ (पांढरे) - २ कप
तूप - २ चमचे
वेलची पावडर - १ टीस्पून
नारळ - २ चमचे (किसलेले)
> प्रथम कढईत तीळ टाका आणि मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा. सुमारे ५-७ मिनिटे हे तीळ भाजून घ्या. तीळ भाजल्यानंतर वेगळ्या भांड्यात काढून घ्या.
> यानंतर त्याच कढईत मध्यम आचेवर तुपात गूळ मिसळा. गूळ थोडा वितळू द्या. सतत ढवळत राहा, नाहीतर गूळ खाली कढईला चिकटेल.
> गूळ वितळल्यावर थोडासा थंड होऊ द्या आणि नंतर त्यात तीळ, वेलची पूड आणि किसलेले खोबरे घाला. शेवटी ते चांगले मिसळा.
> सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या मिश्रणाचे छोटे गोळे करून हाताने लाडू बनवा.
> आता लाडू तयार आहेत. हे लाडू तुम्ही काही वेळेपर्यंत हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता.
संबंधित बातम्या